Download App

Neha Marda Baby Girl: लग्नाच्या ११ वर्षांनंतर नेहा मर्दा झाली आई, गोंडस मुलीला दिला जन्म

  • Written By: Last Updated:

Neha Marda Baby Girl: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा मर्दाला (Neha Marda) प्रेग्नेंसीमध्ये अडचण आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (Balika Vadhu) नेहाने आता गोंडस कन्येला जन्म दिला आहे. नेहाची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली आहे. नुकत्याच एका ऑनलाईन मुलाखतीत नेहाने बाळाच्या आणि तिच्या हेल्थविषयी माहिती दिली.


नेहा मर्दाला आठवडाभरापूर्वी कोलकाता येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता तिची प्रकृती चांगली असून तिने प्रीमॅच्युअर बाळाला जन्म दिला आहे. नेहा मर्दाने एका दिलेल्या मुलाखतीत गरोदरपणात येणाऱ्या समस्यांविषयी सांगितले होते. नेहा मर्दा आणि तिची मुलगी अजूनही रुग्णालयात आहेत.

नेहा म्हणाली, “मी गरोदर राहिल्यापासून मला रक्तदाबाचा त्रास होत होता. पाचव्या महिन्यात त्रास खूपच वाढला. आमच्या डॉक्टरांनी अगोदर आम्हाला याविषयी सावध केले होते. तसेच गुंतागुंत होईल, याची कल्पना देखील नव्हती, पण सुदैवाने सर्वकाही सुरळीत झाले आहे. मला खूप आनंद आहे की हा टप्पा संपला आहे आणि आम्ही एका सुंदर कन्येचे पालक झालो आहोत. मी आणि बाळ दोघीही उत्तम आहोत.

Celina Jaitly: ‘मी घर जावई व्हायला तयार, माझ्याशी लग्न कर’..तर अभिनेत्रीनं दिलं ‘रोमँटिक’ उत्तर

या आठवड्याच्या अखेरीस नेहा आणि तिच्या मुलीला डिस्चार्ज मिळणार आहे. नेहाने मुलीला अद्याप हातात घेतले नाही, तसेच ती तिला नीट बघू देखील शकली नाही. जन्मानंतर बाळ काही काळ त्यांच्याजवळ राहिले, पण नंतर तिला एनआयसीयूमध्ये घेऊन गेले. तिचे वजन खूप कमी आहे, असे नेहानी यावेळी सांगितले आहे.

तसेच नेहाच्या कन्येचे नाव तिची आत्या ठेवणार आहे, कारण त्यांच्या कुटुंबात ती प्रथा असल्याचे तिने सांगितले आहे. दरम्यान नेहा मर्दाने २०१२ मध्ये आयुष्मान अग्रवालशी लग्न केले होते आणि आता ११ वर्षांनंतर ते दोघेही एका गोंडस कन्येचे पालक बनले आहेत.

Tags

follow us