Download App

Bambai Meri Jaan: इमानदार पोलिसाच्या गँगस्टर मुलाची थरारक कहाणी; ‘बंबई मेरी जान’चा ट्रेलर प्रदर्शित

Bambai Meri Jaan Trailer: मुंबई शहराला अगोदर बंबई या नावाने ओळखले जायचे. १९८० आणि ९० च्या दशकाच्या दरम्यान मुंबईत फक्त अंडरवर्ल्डची चांगलीच चलती होती. रुपेरी पडद्यापासून ते ओटीटीपर्यंत गुंडगिरी आणि अंडरवर्ल्डच्या अनेक कथा आपण बघितल्या किंवा ऐकल्या आहेत. त्यामध्ये आता ‘बंबई मेरी जान’ या वेब सीरिजचे नाव जोरदार चर्चेत येत आहे. ज्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

एक कर्तव्यदक्ष आणि इमानदार पोलिस अधिकारी आणि त्याच्याच घरातील गुंडगीरीच्या मार्गाला लागलेला मुलगा अशी ही थरारक कहाणी या सीरिजमधून दाखवली जाणार आहे. फरहान अख्तरच्या एक्‍सेल एंटरटनेमेंटची निर्मिती असलेली ही वेब सीरिज संपूर्ण काल्पनिक असल्याचा दावा करण्यात आला आहे. परंतु ट्रेलर बघून ही सीरिज कुख्यात गँगस्टार दाऊद इब्राहिमच्या आयुष्यावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे.

‘बंबई मेरी जान’ची कथा प्रसिद्ध लेखक आणि ८०-९० च्या दशकातील अंडरवर्ल्डचा कला कारभार जवळून बघणारे क्राइम रिपोर्टर एस हुसैन झैदी यांनी लिहिली आहे. या वेब सीरिजचा ट्रेलर आणि त्यामधील खतरनाक डायलॉगबाजीमुळे एक अनोखा थरार आपल्याला बघायला मिळणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे. अभिनेता के के मेनन सीरिजमध्ये मुख्य पोलिस अधिकाऱ्याची मुख्य भूमिका निभावत आहे.

Avadhoot Gupteने केली ‘लावण्यवती’ या नवीन कलाकृतीची घोषणा; चाहते म्हणाले, “दादाचा…”

अविनाश तिवारी याने त्यांच्या मुलाची भूमिका साकारली आहे. त्यांच्यासोबत कृतिका कामरा, निवेदिता भट्टाचार्य आणि अमायरा दस्तूर यांचा देखील सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिका बघायला मिळणार आहेत. गुन्हेगरी विश्वावर बेतलेल्या या वेब सीरिज बाप आणि त्याच्या मुलाच्या नात्याची थरारक गोष्ट चाहत्यांना बघायला मिळणार आहे. १० भागांची ही वेब सीरिज ‘प्राइम व्हिडीओ’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर १४ सप्टेंबर दिवशी प्रदर्शित करण्यात येणार आहे. ही सीरिज तमिल, तेलुगू, मलयालम, कन्नडसह इतरही भाषांमध्ये बघता येणार आहे. शुजात सौदागर यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

Tags

follow us