Bengaluru Rave Party Central Crime Branch Action : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने ( Central Crime Branch ) बंगळुरूमध्ये ( Bengaluru ) इलेक्ट्रॉनिक्स सिटीजवळ मोठी कारवाई केली. यामध्ये सिंगेना अग्रहारा या भागामध्ये असलेल्या जीएम फार्म हाऊसमध्ये रेव्ह पार्टी ( Rave Party) सुरू होती. ज्यामध्ये अनेक तेलुगु कलाकार तसेच तंत्रज्ञ यांच्यासह तब्बल शंभरहून अधिक लोकांचा समावेश होता. त्यामध्ये 25 मुली देखील होत्या. तसेच अमली पदार्थ देखील ताब्यात घेण्यात आले आहेत.
सावधान, सिंगापूरमध्ये पुन्हा कोरोनाची लाट, भारतात नवीन व्हेरियंटची एंट्री
या कारवाईमध्ये गुन्हे शाखेने एमडीएमए गोळ्या, कोकेन याच्यासह औषधांचा साठा त्या ठिकाणहून ताब्यात घेतला आहे. तसेच या पार्टीमध्ये आलेले अनेक जण ज्यामध्ये डीजे मॉडेल अभिनेते तंत्रज्ञ या व्यवसायाशी संबंधित होते. त्यातील 25 जणांना ही रेव्ह पार्टी आयोजित करणाऱ्यांनी आंध्र प्रदेशातून देखील आणले होते.
Pune Accident News : अटक होण्याच्या भीतीने बिल्डर विशाल अग्रवाल फरार, पोलिसांचा शोध सुरु
हैदराबादमधील वासू या व्यक्तीने आपल्या वाढदिवसानिमित्त ही पार्टी आयोजित केली होती. 18 मे च्या सायंकाळी पाच वाजता ही पार्टी सुरू झाली होती. त्यानंतर 19 मे म्हणजे रविवारी सकाळी सहा वाजेपर्यंत या पार्टीमध्ये प्रचंड गोंधळ आणि गर्दी जमलेली होती. तसेच या पार्टीच्या ठिकाणी आलेल्या वाहनांमध्ये 15 पेक्षा जास्त आलिशान गाड्या आलेल्या होत्या. त्यातील एका गाडीमध्ये आंध्र प्रदेशातील एका आमदाराचा पास देखील आढळून आला आहे.
या पार्टीसाठी एका दिवसाला 50 लाख रुपये खर्च केला गेल्याचं अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तसेच यामध्ये कर्नाटक पोलिसांनी देखील आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करीच्या नेटवर्कमधील काँग्रेसच्या एका 29 वर्षीय नागरिकालाही अटक केली आहे. तर कर्नाटक पोलिसांनी अमली पदार्थ तस्करी प्रकरणी रेंगारा पॉल आणि विपिन यांना ताब्यात घेतले आहे. यातील पॉल हा 2014 पासून शैक्षणिक व्हिसाअंतर्गत बंगळूरूमध्ये राहत होता. तर कॅप्टन या टोपण नावाने तो केरळला ड्रग्स पुरवठा करत असल्याचा संशय पोलिसांना आहे.