Crime : रक्षकच बनला भक्षक! निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा अल्पवयीन मुलीवर अमानुष लैंगिक अत्याचार

Crime : रक्षकच बनला भक्षक! निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा अल्पवयीन मुलीवर अमानुष लैंगिक अत्याचार

Indore Crime :

मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) इंदूर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने (Retired Police Officer) अत्याचार (rape) केल्याची घटना घडली आहे. शनिवारी, 17 जून रोजी ही घटना घडली. नथुराम दुबे (Nathuram Dubey)असे आरोपीचे नाव असून तो नुकताच इंदूरच्या गुन्हे शाखेतून (Indore Crime Branch) उपनिरीक्षक म्हणून निवृत्त झाला आहे.

याबाबत माहिती देताना अतिरिक्त पोलीस आयुक्त सोनाक्षी सक्सेना यांनी सांगितले की, आरोपी पीडितेचा घरमालक आहे. ही घटना घडली तेव्हा मुलीचे कुटुंबीय घरी नव्हते, याचवेळी आरोपीने हे कृत्य केले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तात्काळ विजयनगर पोलीस ठाण्यात  भारतीय दंड संहिता (IPC) कलम 376 आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल (Filed a case) करण्यात आला आहे.  (madhya-pradesh-indore-retired-police-officer-raped-a-minor-girl)

Adipurush : ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनची ‘आदिपुरुष’ सिनेमावर बंदी घालण्याची मागणी

उपायुक्त अभिषेक आनंद यांनी सांगितले की, आरोपी इंदूर क्राइम ब्रँच आणि ट्रॅफिक एएसआय पदावरून निवृत्त झाला आहे. निवृत्त एएसआय नथुराम दुबे यांचे विजय नगर पोलीस स्टेशन परिसरात घर असून, तेथे त्यांनी भाडेकरूच्या 11 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली. मुलीच्या तक्रारीवरून सेवानिवृत्त एसआयविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलीचे आई-वडील घराबाहेर गेले असताना आरोपीने मुलीला घरी चहा बनवण्यासाठी बोलावले. तेथे त्याने मुलीवर अत्याचार करुन तेथून पळ काढला. यानंतर मुलगी रडत रडत शेजारी पोहोचली आणि तिला घटनेची माहिती दिली, त्यानंतर शेजाऱ्याने तिच्या आईला फोन करून संपूर्ण घटनेची माहिती दिली. आईने फोन करून पतीला माहिती दिली आणि त्यानंतर मुलीसह दोघेही विजयनगर पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले आणि तक्रार दाखल केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube