Download App

Salman Khan Threat: मुसेवालाला गोळी घातली आता भाईजानला, गोल्डी ब्रारने सलमानला पुन्हा दिली जीवे मारण्याची धमकी

Salman Khan Death Threat : चाहत्यांचा लाडका बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) म्हणजेच भाईजान (Bhaijaan) गेल्या काही दिवसांपासून धमकी प्रकरणामुळे जोरदार चर्चेत आला आहे. अजूनही तो गँगस्टारच्या फ्रंट लिस्टवर असल्याचे दिसून येत आहे. गँगस्टर गोल्डी ब्रारने (Goldy Brar) पुन्हा एकदा भाईजानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. गँगस्टर गोल्डी ब्रारने भाईजानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. भाईजान हा आमचं टार्गेट असून आम्हाला संधी मिळाल्यावर आम्ही त्याला नक्की संपवून टाकणार असल्याचे त्याने सांगितलं आहे.


तसेच लोकप्रिय गायक सिद्धू मुसेवालाची हत्या त्याच्या टोळीने केली असल्याची कबुली देखील त्याने यावेळी दिली आहे. एका दिलेल्या मुलाखतीमध्ये गोल्डी ब्रार म्हणाला आहे की,”आम्हाला संधी मिळाली की त्याला लगेचच ठार मारणार आहे. आमचा भाई लॉरेन्स बिश्नोईने देखील (Lawrence Bishnoi) त्याला माफी मागायला सांगितली होती. परंतु अद्याप त्याने आजून देखील माफी मागितली नाही. फक्त भाईजानच नाही तर जो कोणी आमचा शत्रू असेल त्यांना नक्कीच आम्ही मारुन टाकणार आहे. सध्या तरी भाईजान हा आमचा टार्गेट आहे.

तसेच सिद्धू मुसेवालाच्या (Sidhu Moose Wala) हत्येचं कारण सांगत गोल्डी ब्रार म्हणाला आहे की,”सिद्धू मुसेवाला खूप वाईट होता. त्याला खूप गर्व होता. तसेच गरजेपेक्षा जास्त लोकप्रियता आणि पैसे त्याच्याकडे होते. राजकीय मंडळी तसेच पोलीस बळाचा त्याने गैरवापर करत असत. त्यामुळे त्याला धडा शिकवण्याचे गरजेचे वाटले. तसेच बॉलिवूडचा भाईजानला अनेकवेळा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या धमकी प्रकरणामुळे मुंबई पोलिसांनी देखील त्याला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.

धर्मग्रंथांना तरी सोडा; सेन्सॉर बोर्ड काय करतं? न्यायालयाने आदिपुरुषच्या निर्मात्यांसह सेन्सॉर बोर्डलाही फटकारलं

तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याने बुलेटप्रुफ गाडी देखील खरेदी केली आहे. तसेच गँगस्टार लॉरेन्स बिश्नोईने देखील भाईजानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. भाईजानच्या त्यांच्या भागात येऊन काळवीट मारल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. त्यामुळे तो मंदिरात जाऊन त्याला माफी मागावी लागणार आहे, जर त्याने माफी मागितली नाही तर मला कठोर पाऊल उचलावे लागणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. मी गुंड नाही, परंतु भाईजानला मारल्यावर गुंड बनेन, असंही लॉरेन्स म्हणाला आहे.

याअगोदर मिळालेल्या धमक्यांबद्दल भाईजान म्हणाला होता की,”धमक्यांकडे जास्त लक्ष दिलं तर त्या धमकी देणाऱ्या व्यक्तीकडे जास्त लक्ष देत आहोत असं होईल, हे अत्यंच चुकीचं आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीला मी काही म्हणालो तर त्याच्या प्लॅनमध्ये तो भक्कमपणे यशस्वी होणार आहे. मी धमक्यांना घाबरणारा नाही. जेव्हा जे व्हायचं तेव्हा ते होणार असल्याच यावेळी भाईजानने प्रतिक्रिया दिला आहे.

Tags

follow us