Nisha Upadhyay: भर लाईव्ह कार्यक्रमात प्रसिद्ध गायिकेवर गोळीबार, नेमकं काय घडलं?

Nisha Upadhyay : भोजपुरी इंडस्ट्रीजची (Bhojpuri Industry) प्रख्यात भोजपुरी गायिका (bhojpuri singer) निशा उपाध्याय (Nisha Upadhyay) हिच्यावर छपरा येथील स्टेज शोच्या दरम्यान गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. मंगळवारी रात्री छपरा येथे एका स्टेज शोच्या दरम्यान निशा हिच्यावर गोळीबार (Firing) करण्यात आला आहे.   View this post on Instagram   A post shared by Kundan […]

Letsupp Image (17)

Nisha Upadhyay

Nisha Upadhyay : भोजपुरी इंडस्ट्रीजची (Bhojpuri Industry) प्रख्यात भोजपुरी गायिका (bhojpuri singer) निशा उपाध्याय (Nisha Upadhyay) हिच्यावर छपरा येथील स्टेज शोच्या दरम्यान गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. मंगळवारी रात्री छपरा येथे एका स्टेज शोच्या दरम्यान निशा हिच्यावर गोळीबार (Firing) करण्यात आला आहे.


त्यानंतर तिची प्रकृती चिंताजनक झाली होती. परिस्थिती बघता निशाला पटना येथे रेफर करण्यात आले आहे. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार निशा उपाध्याय एका कार्यक्रमासाठी छपरा येथे आली होती. या कार्यक्रमाच्या ठिकाणी लोकांनी गोळीबार करण्यात आला आहे. दरम्यान निशाच्या पायाला गोळी लागली आहे.

या घटनेनंतर मोठया प्रमाणात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर गोळीबार करणारा व्यक्ती फरार झाला आहे. डॉक्टरांनी निशा उपाध्यायवर शस्त्रक्रिया करून तिच्या पायातली गोळी काढल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक पोलिसांकडे या घटनेची कोणतीही माहिती नाही.

Sirf Ek Banda Kafi Hai: मनोज बाजपेयींचा ‘‘सिर्फ एक बंदा..’ सिनेमा लवकरच झळकणार मोठ्या पडद्यावर

परंतु मीडिया रिपोर्टनुसार, बिहारमधील सारण या गावात एका सांस्कृतिक कार्यक्रमात निशा गाणं गाण्यासाठी गेलेली असताना ही धक्कादायक घटना घडली. निशा ही भोजपुरीमधील प्रसिद्ध गायिका असून ती लोकगीतांसाठी ती ओळखली जाते.

Exit mobile version