दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘नई नवेली’चा धमाका; यामी गौतम धर यांची फँटसी-फॅमिली फिल्म ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार!

Nayyi Naveli दसरा २०२६च्या निमित्ताने प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा एक नवा अनुभव घेऊन ‘नई नवेली’ हा चित्रपट येत आहे.

Nayi Naveli

Nayi Naveli

big splash for ‘Nai Naveli’ on Dussehra; Yami Gautam Dhar’s fantasy-family film to release soon : दसरा २०२६च्या निमित्ताने प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा एक नवा अनुभव घेऊन ‘नई नवेली’ हा चित्रपट येत आहे. Amazon MGM Studios आणि Colour Yellow यांनी या नव्या फँटसी फॅमिली एंटरटेनरची घोषणा केली आहे. चित्रपटात यामी गौतम धर प्रमुख भूमिकेत दिसणार असून, कुटुंब, विनोद, फँटसी आणि साहस यांचा अनोखा संगम या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

चित्रपटाचा अधिकृत व्हिडीओ

या चित्रपटाचे दिग्दर्शन बालाजी मोहन यांनी केले आहे. हिमांशु शर्मा आणि दिव्य निधी शर्मा यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे. आनंद एल. राय आणि हिमांशु शर्मा यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली असून, संगीताची धुरा प्रसिद्ध संगीतकार जी. व्ही. प्रकाश कुमार यांच्याकडे आहे. ‘नई नवेली’ १६ ऑक्टोबर २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

परफेक्ट नवरीची एन्ट्री आणि गोंधळलेल्या कुटुंबाची भन्नाट गोष्ट

‘नई नवेली’ची कथा मेरठमधील एका गोंधळलेल्या आणि अतरंगी कुटुंबात लग्न करून येणाऱ्या नवरीभोवती फिरते. सुरुवातीला ही नवरी अत्यंत समजूतदार आणि आदर्श सून असल्याचे दिसते. तिच्या आगमनानंतर घरातील वातावरणच बदलून जाते. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होते आणि सर्व काही सुरळीत सुरू असल्याचे भासते.

आकडा जुळतोय, क्षीरसागर भावंडांचे हातही एकमेकांपुढे आता पालिकेसाठी एकिकरण कधी?

मात्र, काही काळानंतर तिच्या दिराला तिच्या वागण्याबद्दल संशय येऊ लागतो. दिसायला इतकी परफेक्ट असलेली वहिनी खरोखरच तितकी साधी आणि सामान्य आहे का, असा प्रश्न त्याला पडतो. पुढे त्याचा संशय आणखी वाढतो आणि त्याच्या मनात एक भन्नाट शंका निर्माण होते—आपली वहिनी खरंच डायन तर नाही ना?याच प्रश्नातून चित्रपटाची कथा वेगळ्या आणि मनोरंजक वळणावर जाते. या नवरीचे नेमके रहस्य काय आहे आणि तिच्या येण्यामुळे या कुटुंबाच्या आयुष्यात पुढे काय घडते, हे चित्रपटातून समोर येणार आहे.

यामी गौतम धर दिसणार नव्या रूपात

‘नई नवेली’मध्ये यामी गौतम धर यांचा यापूर्वी न पाहिलेला अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यांच्या व्यक्तिरेखेत निरागसपणा, आपलेपणा आणि खोडकरपणा यांचे मिश्रण पाहायला मिळणार असल्याचे चित्रपटाच्या संकल्पनेवरून दिसून येते.Amazon MGM Studios चे संचालक आणि Prime Video India तसेच Amazon MGM Studios मधील SVOD Originals चे प्रमुख निखिल मधोक यांनी चित्रपटाबद्दल उत्साह व्यक्त केला. त्यांच्या मते, चित्रपट पूर्ण झाल्यानंतर ही कथा दसऱ्याच्या सणासाठी योग्य असल्याची टीमला जाणीव झाली. त्यांनी यामी गौतम धर यांच्यासह संपूर्ण कलाकारांच्या कामाचेही कौतुक केले.Amazon MGM Studios आणि Colour Yellow यांची ही भागीदारी कुटुंबासोबत चित्रपटगृहात जाऊन सिनेमा पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक खास मनोरंजनाचा अनुभव देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आनंद एल. राय म्हणतात, ‘प्रत्येक वळणावर आश्चर्याचा धक्का’

निर्माते आनंद एल. राय यांच्या मते, ‘नई नवेली’ची कथा प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत वेगवेगळ्या वळणांवर आश्चर्यचकित करेल. हिमांशु शर्मा यांच्यासोबत या कथेवर पहिल्यांदा चर्चा झाली, तेव्हाच तिची अनोखी संकल्पना त्यांना भावली होती.कौटुंबिक नातेसंबंधांसोबत फँटसी, विनोद आणि साहस यांची सांगड या सिनेमात घालण्यात आली आहे. या भूमिकेसाठी यामी गौतम धर अगदी योग्य अभिनेत्री असल्याचे आनंद एल. राय यांनी म्हटले आहे. व्यक्तिरेखेला आवश्यक असलेला आपलेपणा आणि खोडकरपणा त्यांच्या अभिनयात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दसऱ्याला मिळणार फॅमिली एंटरटेनमेंटचा फुल डोस!

‘नई नवेली’ची खासियत म्हणजे फँटसी आणि कौटुंबिक मनोरंजनाचा अनोखा मेळ. एका बाजूला कुटुंबातील मजेशीर प्रसंग, नात्यांमधील खटके आणि विनोद पाहायला मिळणार आहेत, तर दुसरीकडे कथेत गूढ आणि फँटसीचा रंगही पाहायला मिळणार आहे.दसऱ्यासारख्या सणाच्या काळात हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची निर्मात्यांची तयारी आहे. त्यामुळे विशेषतः कुटुंबासोबत चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना हा सिनेमा आकर्षित करेल, अशी अपेक्षा आहे.

धनुष्यबाण चिन्ह गोठवा! शिवसेना ठाकरेंचीच, सिब्बल यांची सर्वोच्च न्यायालयात मोठी मागणी

आता प्रेक्षकांना १६ ऑक्टोबर २०२६ची प्रतीक्षा आहे. यामी गौतम धर यांची ‘नई नवेली’, मेरठमधील अतरंगी कुटुंब आणि नवरी डायन असल्याचा निर्माण झालेला संशय—या सगळ्याभोवती फिरणारी ही अनोखी कथा दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांना हसवतानाच रहस्य आणि फँटसीने खिळवून ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Exit mobile version