आकडा जुळतोय, क्षीरसागर भावंडांचे हातही एकमेकांपुढे आता पालिकेसाठी एकिकरण कधी?

Beed Politics in Kshirsagar Brothers बीडमध्ये एका कार्यक्रमात संदीप क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर एक मंचावर, पालिकेत एकत्र येण्याची चर्चा

Beed Politics In Kshirsagar Brothers

दत्ता देशमुख, लेट्सअप मराठी, प्रतिनिधी बीड

Beed Politics in NCP BJP Kshirsagar Brothers will be toghter soon for Municipal Council : ३५ वर्षानंतर बीड नगर पालिकेवरील क्षीरसागरांची सत्ता घालवण्यात राष्ट्र्वादी काँग्रेसला यश आले. मात्र, सत्ताधाऱ्यांतच दोन गट पडले. त्यातच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकमेकांचे विरोधक असलेले क्षीरसागर बंधूंनी दिप प्रज्वलनासाठी मेणबत्ती देण्यासाठी एकमेकांसमोर हात आणल्याने दोन्ही क्षीरसागर एक होणार आणि बीड पालिकेत नवा डाव खेळणार अशा अटकळी बांधल्या जाऊ लागल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर व भाजपचे डॉ. योगेश क्षीरसागर यांच्याकडील संख्याबळ उपनगराध्यक्ष व सभापतींवर अविश्‍वास आणण्यायेवेढे आहे. मात्र, महिनाभरापासून क्षीरसागरांच्या एकिककरणाच्या अध्यायाचे पान अद्याप काही उलटलेले नाही.

धनुष्यबाण चिन्ह गोठवा! शिवसेना ठाकरेंचीच, सिब्बल यांची सर्वोच्च न्यायालयात मोठी मागणी

बीड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात क्षीरसागर हे प्रमुख घराणे. दिवंगत लोकनेत्या माजी खासदार केशरकाकू क्षीरसागर यांच्यानंतर त्यांचे थोरले चिरंजीव जयदत्त क्षीरसागर विधानसभा, डॉ. भारतभूषण क्षीरसागर बीड नगर पालिका तर रवींद्र क्षीरसागर सहकार आणि जिल्हा परिषद अशा अलिखीलत राजकीय वाटण्या क्षीरसागर घराण्यात होत्या. तिसऱ्या पिढीत संदीप क्षीरसागर पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या राजकारणात सक्रीय झाले. दोन्ही संस्थांमध्ये सभापती म्हणून काम केल्यानंतर त्यांनी मागच्या नगर पालिका निवडणुकीत थेट तत्कालिन आमदार जयदत्त क्षीरसागर व डॉ. भारतभूषण क्षीरसागर या दोन्ही काकांसमोर दंड थोपटत आव्हान दिले. पण, अर्धी – अर्धी सत्ता क्षीरसागरांच्याच घरात राहिली.

गॉलमध्ये भारताचा जलवा!श्रीलंकेचा 165 धावांनी धुव्वा, WTC फायनलच्या दिशेने दमदार पाऊल

तत्पुर्वींच्या अनेक निवडणुकांत क्षीरसागरांना विविध नेत्यांनी आव्हान दिले. परंतु, अपवाद वगळता कोणीही क्षीरसागरांचे नगर पालिकेतील सत्तेचे सिंहासन हलवू शकले नव्हते. दरम्यान, या निवडणुकीवेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाच बीड शहराच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसची धुरा सांभाळणाऱ्या डॉ. योगेश क्षीरसागर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे स्थानिक राष्ट्रवादी नेतृत्वाविना पोरकी झाली. दुसऱ्या फळीतील नेत्यांचा आग्रह आणि दिवंगत पवारांच्या सुचनेमुळे आमदार विजयसिंह पंडित यांनी बीडच्या निवडणुकीत लक्ष घातले. दिवंगत पवारांच्या शब्दाला मान आणि पंडितांच्या पुढाकाराने बीडमध्ये सत्ता परिवर्तनही झाले. परंतु, मागच्या काही दिवसांपासून सत्तेला फुटीची बाधा जडली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याच ११ नगरसेवकांनी स्वतंत्र गट केला आहे.

पालिकेत क्षीरसागर एकत्रिकरणाची चर्चा तेव्हाही आणि आताही

नगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रेमलता पारवे नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील भाजप उमेदवार दुसऱ्या तर आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार तिसऱ्या स्थानी गेला. मात्र, निवडणुकीत ५२ पैकी राष्ट्रवादी काँग्रेस १९, भाजप १५ तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे १२ तसेच शिवसेना ०३, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) ०१, कॉंग्रेस एक आणि एमआयएम ०१ नगरसेवक विजयी झाले. उपनगराध्यक्ष व सभापती निवडणुकीत दोन्ही क्षीरसागर भावंडांच्या नगरसेवकांची संख्या सत्ताधाऱ्यांपेक्षा अधिक होती. त्यामुळे पंडितांना शह देण्यासाठी पालिकेपुरते भावंडे एकत्र होणार अशी चर्चा सुरु झाली. परंतु, संदीप क्षीरसागर यांनी राजकीय परिपक्वता दाखवत (दिवंगत अजित पवार त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने त्यांच्या विरोधी निर्णय नको म्हणून) सत्ताधाऱ्यांना बिनशर्त पाठिंब्याची खेळी खेळली. नंतर, बिंदुसरेतून बरेच पाणी वाहून गेले आणि सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातच गटबाजी पडली. त्याच काळात एका महसूलच्या कार्यक्रमात योगायोगाने एकत्र आलेल्या संदीप क्षीरसागर यांनी दिप प्रज्वलन केल्यानंतर डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या हाती मेणबत्ती दिली. या दृश्‍यावरुन क्षीरसागर पालिकेत एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली. यावेळी दोन्ही क्षीरसागर भावंडांनी देखील एकीकरणाला पुरक प्रतिक्रिया दिल्या.

गणित जुळतेय, नेमकी अडचण काय?

दरम्यान, प्रेमलता पारवे जनतेतून नगराध्यक्ष असल्याने या परिस्थितीत त्यांच्यावर अविश्‍वास आणणे दुरापास्त आहे. पण, उपनगराध्यक्ष व सभापतींविरोधात अविश्‍वास आणणे किंवा त्यांच्या विरोधात ठराव संमत करुन घेण्याइतपत दोन्ही क्षीरसागर भावंडांचे संख्याबळ आहे. कारण, डॉ. योगेश क्षीरसागर यांच्याकडे भाजपचे १५ तर आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे १२ आणि सोबत लढलेल्या शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) एक अशी दोघांची मेजॉरिटी होत आहे. पण, पालिकेत एकत्रिकरणाच्या चर्चेच्या अध्यायाला महिना लोटला तरी राजकीय हालचाली मात्र थंडावल्याचे दिसते.

पिंपळवंडीतील चिमुकलीवरील अत्याचाराची घटना मन हेलावणारी; कठोर शिक्षा द्या 

राजकीय जाणकारांच्या मते भाजपसोबत जाताना संदीप क्षीरसागर गटातील मुस्लिम नगरसेवक तेवढे अनुुकुल असू शकणार नाहीत. तसेच, आज अर्ध्या सत्तेतील (उपनगराध्यक्ष व सभापती) अर्धे वाटेकरी व्हायचे झाले तरी बीड शहर आणि बीड नगर पालिका कार्यक्षेत्रात संदीप क्षीरसागर यांचे राजकारण मुळात क्षीरसागर विरोधक म्हणून सुरु झाले आणि टिकून आहे. राहीला प्रश्‍न पंडितांना शह देण्याचा तर त्यांच्यापासून फुटलेल्या गटातील काही नगरसेवक संदीप क्षीरसागर व डॉ. योगेश क्षीरसागर यांनाच जवळ नको आहेत. त्यामुळेच बीड नगर पालिकेतील क्षीरसागर एकत्रीकरणाच्या अध्यायाचे पुढचे पान उलटले जात नाही.

follow us