Download App

Sonia Bansal: बिग बॉस फेम अभिनेत्रीची प्रकृती अचानक बिघडली; हॉस्पिटलमधील व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत

Bigg Boss Fame Actress Sonia Bansal Hospitalized : अभिनेत्री सोनिया बन्सल यांची प्रकृती रात्री उशिरा अचानक बिघडल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Sonia Bansal Hospitalized: ‘बिग बॉस 17’ (Bigg Boss 17) या रिॲलिटी शोमध्ये अनेक सेलिब्रिटींनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मात्र, या शोमध्ये दिसलेल्या सोनिया बन्सलने (Sonia Bansal) आपल्या क्यूटनेस आणि स्टाईलने सर्वांना वेड लावले. या शोमध्ये अभिनेत्रीची जादू जास्त काळ टिकू शकली नसली तरी घरातून बाहेर पडल्यानंतर सोनियांनी खूप प्रसिद्धी मिळवली आहे. नुकतचं अभिनेत्री सोनिया बन्सलची (Sonia Bansal Hospitalized) प्रकृती रात्री उशिरा अचानक बिघडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानंतर अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.


4 महिन्यांपासून पॅनीक अटॅक

सोनिया बन्सलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्री बेडवर वेदनेने रडताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सोनियांची प्रकृती अत्यंत वाईट असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. सोनियांचे डोळे वेदनेने मिटले असून ती बेशुद्ध अवस्थेत दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अभिनेत्रीचे चाहतेही तिच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. सोनिया बन्सल गेल्या 4 महिन्यांपासून पॅनिक अटॅकच्या समस्येने त्रस्त आहेत. याशिवाय तिला मानसिक आरोग्याशी संबंधित काही समस्याही आहेत.

सोनिया बन्सल काल रात्री एका पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या. येथून परतत असताना तिला अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सोनियावर उपचार सुरू आहेत. सोनिया बन्सल या रिॲलिटी शो ‘बिग बॉस’च्या 17व्या सीझनमध्ये प्रेक्षकांनी पाहिल्यापासूनच ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. मात्र, या शोमधील तिचा खेळ फार काळ टिकू शकला नाही आणि शोमधून बाहेर पडणारी ती पहिली स्पर्धक होती.

Sonia Bansal : सोनिया बन्सलचे हॉट फोटोशूट, चाहते फिदा

सोनिया कमी मतांमुळे नाही तर घरातील सदस्यांना बाहेर काढल्यामुळे शोमधून बाहेर पडली होती. सोनिया बन्सल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अभिनेत्री चाहत्यांसाठी ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. सोनियांचा क्यूटनेस पाहून चाहतेही वेडे झाले आहेत. मात्र, आता रुग्णालयात वेदनांनी त्रस्त अभिनेत्रीला पाहून चाहतेही अस्वस्थ झाले आहेत आणि सोनिया लवकरात लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

follow us