Santosh Chaudhari : ‘बिग बॉस’फेम दादूसचा हळदीच्या कार्यक्रमात हवेत गोळीबार

Santosh Chaudhari : आगरी समाजातील लग्नात हळदीचा समारंभ हा महत्त्वाचा मानला जातो. सामिष जेवण आणि पारंपरिक गीतांचा कार्यक्रम या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण… खास ड्रमसेटसह सगळा वाद्यवृंद आणि गायक-गायिका यांच्यासह हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. ‘बिग बॉस’ (Bigg Boss) फेम संतोष चौधरी (Santosh Chaudhari) उर्फ दादूस सध्या जोरदार चर्चेत आहे. नुकत्याच एका हळदीच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हवेत गोळीबार […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 15T103002.164

Santosh Chaudhari

Santosh Chaudhari : आगरी समाजातील लग्नात हळदीचा समारंभ हा महत्त्वाचा मानला जातो. सामिष जेवण आणि पारंपरिक गीतांचा कार्यक्रम या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण… खास ड्रमसेटसह सगळा वाद्यवृंद आणि गायक-गायिका यांच्यासह हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. ‘बिग बॉस’ (Bigg Boss) फेम संतोष चौधरी (Santosh Chaudhari) उर्फ दादूस सध्या जोरदार चर्चेत आहे.

नुकत्याच एका हळदीच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हवेत गोळीबार केला आहे. त्यांचा हवेत गोळीबार करतानाचा त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. संतोष चौधरी (Santosh Chaudhari) यांचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानवर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) याप्रकरणी तपास सुरू केला आहे. हा व्हिडीओ आरएके मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून पोलीसांचा अधिक तपास सुरू आहे.

मध्यरात्री आरएके मार्ग पोलिसांचे एक पथक हळदी कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या वराच्या घरी गेले होते. मात्र वर आणि त्याचे कुटुंबीय घरी नव्हते. पोलिसांचे कुटुंबातील काही लोकांशी बोलणं झाले आहे. त्यांनी दावा केला आहे की, संतोष चौधरी यांनी वापरलेली बंदूक खेळण्यातली होती. हळदीच्या कार्यक्रमाच्या दरम्यान गोळीबार करण्यासाठी संतोष चौधरी यांनी वापरलेल्या बंदूकीचा पोलीस तपास करत आहेत.

यासंदर्भामध्ये त्यांनी संतोष चौधरी यांच्याशीदेखील संपर्क साधला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस दादूसला चौकशीकरिता बोलावतील आणि त्यांना काही गैरप्रकार आढळल्यास ते पुढील कारवाई करणार असल्याचे सांगितले जात आहे. दादूस उर्फ संतोष चौधरी यांचे हळदी कार्यक्रम सतत सुरू असतात. सध्या लग्नाचा सीझन असल्याने अनेक ठिकाणी त्यांच्या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात येत असते.

The Kerala Story फेम अभिनेत्रीचा अपघात, ट्विट करत दिली माहिती

आता मराठी मनोरंजनसृष्टीतील एका लोकप्रिय संगीतकाराच्या हळदी कार्यक्रमात दादूसचा ऑर्केस्ट्रा ठेवण्यात आला होता. सचिन भांगरे हा नुकताच लग्नबंधनामध्ये अडकला आहे, त्याच्या हळदीला दादूसच्या ऑर्केस्टाचे आयोजन करण्यात आले होते. दादूसने त्याच्या आगरी स्टाइलने सचिनची हळद जोरदार नाचवली. दरम्यान खिशातून बंदूक काढून दादूसनी हवेमध्ये गोळीबार केला आहे. हा सर्व प्रकार कॅमेरात कैद झाला असून सोशल मीडियावर व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

Exit mobile version