The Kerala Story फेम अभिनेत्रीचा अपघात, ट्विट करत दिली माहिती

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 27T143424.281

The Kerala Story Actress Ada Sharma Accident :‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) हा चित्रपट 5 मे रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. सिनेमाच्या कथेवरुन जोरदार वाद निर्माण झाला आहे. या सिनेमात ३२ हजार महिलांच्या धर्मांतराचा दावा खोटा आहे, हा एक प्रोपगंडा सिनेमा आहे, असं म्हणत अनेक राजकीय पक्ष (political party)आणि संघटनांनी सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आला आहे. पण तसं जरी असलं तरी देखील या सिनेमाने पहिल्या आठवड्यामध्ये मोठी कमाई केली आहे.

या दरम्यान आता ‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्माचा अपघात झाला आहे. रविवारी एका हिंदू यात्रेत सहभागी होत असताना हा अपघात झाला. याबद्दल अगोदर चित्रपटाचे दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी तिच्या अपघाताबद्दल ट्विट करत माहिती दिली होती. त्यांनी सांगितले की, ‘आम्ही करीमनगरमधील एका मेळाव्यात चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जात होतो. पण दुर्दैवाने आमचा अपघात झाला. त्यामुळे आम्ही करीमनगरला पोहचू शकलो नाही. आमच्या सिनेमाला मात्र पाठिंबा देत राहा.’

त्यानंतर आता स्वतः अभिनेत्री अदा शर्माने देखील ट्विट करत आपल्या तब्बेतीची माहिती दिली. तिने या ट्विटमध्ये लिहिले की, ‘ मित्रांनो मी ठीक आहे. आमच्या अपघातासंदर्भात अनेक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण माझ्यासह आमच्या टीममधील सर्व मंडळी ठीक आहेत. कोणाला गंभीर दुखापत झालेली नाही. माझ्याबद्दल काळजी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद’.

‘धकधक गर्ल’चा आज वाढदिवस, माधुरी दीक्षितचे सुरूवतीचे अनेक चित्रपट फ्लॉप, आज करोडोंच्या संपत्तीची मालकीण

Tags

follow us