‘धकधक गर्ल’चा आज वाढदिवस, माधुरी दीक्षितचे सुरूवातीचे अनेक चित्रपट फ्लॉप, आज करोडोंच्या संपत्तीची मालकीण

‘धकधक गर्ल’चा आज वाढदिवस, माधुरी दीक्षितचे सुरूवातीचे अनेक चित्रपट फ्लॉप, आज करोडोंच्या संपत्तीची मालकीण

Madhuri Dixit bithday : बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितसाठी (Madhuri Dixit) आजचा दिवस खूप खास आहे. माधुरी आज तिचा 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. आजही लाखो प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या माधुरीचा जन्म १५ मे १९६५ रोजी मुंबईत झाला. लहानपणी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणारी माधुरी पुढे बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री बनली. माधुरीने 1984 मध्ये आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली आणि अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. माधुरी दीक्षित ९० च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री म्हणून प्रसिद्धीच्या झोतात राहिली. हिच माधुरी दीक्षित एक अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम बिझनेस वुमन (Business woman) देखील आहे. विशेष म्हणजे माधुरीनं एक गावही दत्तक घेतले आहे. बघूया किती आहे या माधुरीची संपत्ती.

माधुरी दीक्षितने 1985 मध्ये अबोध चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या पहिल्या चित्रपटाच्या वेळी माधुरी फक्त 17 वर्षांची होती. माधुरीचा हा चित्रपट काही फार चालला नाही. यानंतरही माधुरीचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप गेले. करिअरच्या सुरुवातीच्या काळात माधुरीचे काही चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर 1988 मध्ये आलेल्या ‘तेजाब’ चित्रपटाने माधुरीला रातोरात स्टार बनवले. त्यानंतर ‘दयावान’, ‘दिल’, ‘खलनायक’, ‘साजन’, ‘बेटा’, ‘हम आपके है कौन’ यासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांनी माधुरी दीक्षितचे नाव घराघरात पोहोचले. माधुरीने 2002 पासून बॉलिवूडमधून थोडा ब्रेक घेतला आणि 2007 मध्ये आजा नचले या चित्रपटातून पुनरागमन केले. माधुरी दीक्षितला 35 वर्षांहून अधिक काळ फिल्म इंडस्ट्रीत झाला आहे. मात्र आजही माधुरीचे सौंदर्य अबाधित आहे.

माधुरीची ऑनलाइन डान्स अकादमी आहे. त्याचे नाव आहे डान्स विथ माधुरी. यातून माधुरीला अतिरिक्त उत्पन्न मिळते. त्याचप्रमाणे, ती RNM मूव्हिंग पिक्चर्सची सह-संस्थापक आहे. ही निर्मिती कंपनी माधुरीचे पती श्रीराम नेने यांनी सुरू केली. माधुरीने स्टार्टअप कंपनीचीही घोषणा केली आहे. या कंपनीचे नाव GOQII आहे. फिटनेस तंत्रज्ञानासाठी ही कंपनी सुरू करण्यात येणार आहे.

माधुरी दीक्षितची संपत्ती किती?
माधुरी दीक्षित जवळपास 250 कोटींची मालकीण आहे. ती वर्षाला 12 कोटी कमवते. चित्रपटांसोबतच ती अनेक ब्रँड्सचे प्रमोशनही करते. अनेक जाहिरातींमध्ये काम करतो. यातून त्यांना लाखो रुपये मिळतात. त्याचप्रमाणे माधुरीही अनेक शोज जज करते. एका रिअॅलिटी शोला जज करण्यासाठी माधुरी 25 कोटी रुपये घेते. तसेच माधुरी एका जाहिरातीसाठी 8 कोटी रुपये घेते. तर एका चित्रपटासाठी 4-5 कोटी रुपये घेते. माधुरीनेही महाराष्ट्रातील एक गावही दत्तक घेतले आहे. अनेक महत्त्वाच्या दिवशी ती त्या गावाला भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेते.

संजय दत्त माधुरीला मॅम म्हणतो
आजचे अनेक स्टार माधुरीला खूप मान देतात. तिचे सहकलाकारही तिला आदराने मॅडम म्हणतात. माधुरीच्या करिअरच्या सुरुवातीला तिचे नाव संजय दत्तसोबत जोडले गेले. पण आता हा अभिनेता देखील माधुरीला मॅम म्हणतो.

माधुरी दीक्षितने आयुष्यात अनेकदा यशाची शिखरे पाहिली आहेत. तिला पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. इतकेच नाही तर माधुरीने एक-दोनदा नव्हे तर तब्बल 6 वेळा ‘फिल्मफेअर अवॉर्ड्स’ मिळवला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube