Download App

Gautami Patil: गौतमी पाटीलची बिग बॉसमध्ये होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री?

Gautami Patil Bigg Boss Offer: आपल्या अदा आणि डान्सने वेड लावणारी गौतमी पाटील (Gautami Patil) कायम लाइमलाइटमध्ये असते.

Gautami Patil Bigg Boss Offer: आपल्या अदा आणि डान्सने वेड लावणारी गौतमी पाटील (Gautami Patil) कायम लाइमलाइटमध्ये असते. तिची क्रेझ खूप असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत तिचे चाहते आहेत. (Bigg Boss Marathi New Season 5) महिलांमंडळी देखील तिच्यासाठी वेड्या आहेत. अनेकांच्या ओठांवर तिचंच कायम नाव असतं. तिचा साधेपणा, खतरनाक डान्स, हटके अदा अनेकांना तिच्या प्रेमात पाडतात. गौतमी बिग बॉसच्या (Bigg Boss Offer) घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री (Wild Card Entry) करणार अशा अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा रंगताना दिसत आहेत. मात्र अखेर यामागचं कारण समोर आलंय.


सबसे कातिल गौतमी पाटीलला कलर्स मराठीवरच्या बिग बॉसच्या घरात वॉईल्ड कार्डद्वारे थेट एन्ट्रीची खुली ऑफर देण्यात आली होती. मात्र तिने ती ऑफर नाकारली आहे. त्यामुळे चाहते तिला बिग बॉसमध्ये पाहण्यासाठी उत्सुक होते त्यांची निराशा झाल्याचे दिसत आहे.

बिग बॉस नाकारण्या पाठीमागचे कारण देखील गौतमीने स्पष्ट केले आहे. राज्यभरातील नियोजित शोजच्या तारखा आधीपासूनच फिक्स असल्याचे तिने यावेळी सांगितले आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरात जाण्यास नकार दिल्याचं सांगितले जातंय. यामुळे आता या चर्चांवर पूर्णविराम लागला असून गौतमी बिग बॉस करणार नसल्याचं कन्फर्म माहिती समोर आली आहे.

Bigg Boss Marathi : डिपी दादांची नाराजी; बदलणार टीम B च्या खेळाचे इक्वेशन?

नुकतंच झालेल्या दहीहंडी उत्सवातही गौतमीने मुंबई, ठाण्यातल्या दहीहंडी मंडळांसमोर जोरदार डान्स करून गोविंदांचे लक्ष वेधून घेतलं होतं. पुण्यातील वाघोलीमध्ये तर गौतमीचा शो लावता यावा, यासाठी चक्क गोकुळ अष्टमीच्या दुसऱ्या दिवशी देखील दहीहंडी फोडन्यात आली होती. आताच्या गणेशोत्सवात देखील गौतमीच्या तारखा बूक असल्याचे तिने सांगितले आहे. त्यामुळे ती बिग बॉसच्या घरात जायला नकार दिल्याची माहिती समोर आली आहे.

follow us