Bigg Boss Marathi : डिपी दादांची नाराजी; बदलणार टीम B च्या खेळाचे इक्वेशन?

Bigg Boss Marathi : डिपी दादांची नाराजी; बदलणार टीम B च्या खेळाचे इक्वेशन?

Bigg Boss Marathi New Season Day 40 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात झाली असून (Bigg Boss Marathi New Season ) आज 40 वा दिवस आहे. (Bigg Boss Marathi ) गेल्या 40 दिवसांपासून सर्वच सदस्य प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहेत. (Bigg Boss Marathi New Promo) पण आता 40 दिवसांनंतर घरातील इक्वेशन बदलू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. डीपी दादांची (DP Dada) नाराज बदलणार का टीम B च्या खेळाचे इक्वेशन हे आता पाहावे लागेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये (Bigg Boss Marathi New Promo) डीपी दादा आणि अंकिता (Ankita) संभाषण करताना दिसत आहेत. डीपी दादा म्हणत आहेत,”अती बोलल्याने किंमत शून्य झाली आहे एवढचं आहे. ग्रुपमध्ये कधी माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही”. त्यावर अंकिता डीपी दादा ग्रुप सोडायचाय का विचारते. यावर डीपी दादा होकार देतात. त्यानंतर अंकिता यासंदर्भात पॅडी दादांना सांगताना दिसून येते. पॅडी दादा म्हणतात,”ग्रुपवर अविश्वास दाखवताय तुम्ही. मुळात चुकलंय काय?”. त्यावर अंकिता म्हणते,”ते जे फील करतात ते खूप चुकीचं आहे. त्यामुळे सगळे इक्वेशन बदलतील”.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात सुरू आहे गुपचूप टास्कची प्लॅनिंग

‘बिग बॉस मराठी’च्या घरात गुपचूप टास्कची प्लॅनिंग सुरू आहे. कोणी प्रॉमिस देतंय तर कोणी नाटक करताना दिसून येत आहे. निक्कीने आणि घन:श्याम आणि अंकिता, वर्षा ताई, अभिजीत टास्क जिंकण्यासाठी गुपचूप जोरदार प्लॅनिंग करताना आजच्या भागात दिसून येणार आहेत. त्यामुळे कोण टास्क जिंकणार आणि कोण हरणार हे पाहावे लागेल.

Bigg Boss Marathi: ‘तुला थोडी तरी लाज असेल तर…’ जान्हवी निक्कीवर भडकली

‘बिग बॉस मराठी’च्या स्टॉपवरुन सुटणार कॅप्टनसी कंटेन्डरची बस

‘बिग बॉस मराठी’च्या घरात नेहमीच नाविन्य पाहायला मिळतं. घरातील सर्व सदस्यांच्या खेळात नेहमीच कल्ला, राडा, गोंधळ आणि धिंगाणा पाहायला मिळतो. पण प्रत्येक सदस्याचा नवा गेम मात्र चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतो. आज ‘बिग बॉस मराठी’च्या स्टॉपवरुन कॅप्टनसी कंटेन्डरची बस सुटणार आहे. ‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये आज बिग बॉस मराठीच्या स्टॉपवरुन कॅप्टनसी कंटेन्डरची बस सुटलेली दिसून येत आहे.

दरम्यान घरातील सदस्य बसमध्ये बसण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. अंकिता पॅडी दादाला विचारतेय,”गणपतीत कोकणात जाण्यासाठी तिकीट कनफॉर्म करू का?”. यावर उत्तर देत पॅडी दादा त्यांचं बुकिंग झाल्याचं सांगतात. दुसरीकडे अरबाज म्हणतोय,”घन:श्यामपेक्षा मी कॅप्टनसी चांगली करू शकतो”. त्यावर अभिजीत म्हणतो,”घन:श्याम कॅप्टन का होऊ शकत नाही?”. कॅप्टनसी कंटेन्डरची बस कधी सुटणार? या बसमध्ये प्रवासी काय धुमाकूळ घालणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच या आठवड्याचा कॅप्टन कोण होणार हेदेखील पाहावे लागेल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube