Bigg Boss Marathi : सूरजवर जळतोय पॅडी दादा; नेमकं प्रकरण काय?

Bigg Boss Marathi : सूरजवर जळतोय पॅडी दादा; नेमकं प्रकरण काय?

Bigg Boss Marathi New Season Day 39 : ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi New Season) पाचव्या पर्वाचा सहावा आठवडा देखील दणक्यात सुरू झाला आहे. (Bigg Boss Marathi ) आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नॉमिनेशन (Nomination) टास्क पार पडला. आज घरात सर्वच सदस्य धुमाकूळ घातलाना दिसणार आहेत. तर दुरारीकडे गंमतीत पॅडी दादा (Paddy Kamble) सूरजवर (Suraj Chavan) चिडलेला दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो (Bigg Boss Marathi New Promo) समोर आला आहे. प्रोमोमध्ये वर्षा ताई सूरजला जेवायला बोलवत आहेत. वर्षा ताईनी फक्त सूरजला बोलावल्याने पॅडी दादा मात्र नाराज झालेले आहेत. त्यांनी आपली नाराजीदेखील व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे सूरजला असं वाटत आहे की पॅडी दादा त्याच्यावर जळत आहेत. बिग बॉस मराठीचा आजचा भाग खूपच रंगतदार असणार आहे. आजच्या भागात काय होणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

बीबी करन्सीसाठी BB फार्ममध्ये सदस्यांचा जोरदार राडा

‘बिग बॉस मराठी’च्या घरात सहाव्या आठवड्याची सुरुवात झालेली आहे. पहिल्या दिवसापासून संपूर्ण घर ‘टीम A’ आणि ‘टीम B’ अशा दोन गटांमध्ये विभागलं गेलं होतं. परंतु, गेल्या आठवड्यापासून सदस्यांमध्ये असलेल्या मैत्रीचं समीकरण काहीसं बदललं आहे. आज बीबी करन्सीसाठी BB फार्ममध्ये सदस्य जोरदार राडा करताना दिसत आहेत.

Bigg Boss Marathi निक्की-अरबाज पुन्हा एकत्र येणार; नवा गेम प्लॅन तर नाही ना?

‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात सदस्य बी बी फार्ममध्ये राडा करताना दिसणार आहेत. बीबी फार्ममधून जास्तीत जास्त दूध गोळा करताना चांगलाच कल्ला करणार आहेत. कोणती टीम बीबी फार्ममधून दूध गोळा करण्यात बाजी मारेल याकडे सर्वांचं आता लक्ष लागलं आहे. या टास्कमध्ये घरातील सर्वच सदस्य जोरदार राडा करताना दिसणार आहेत. त्यांचा हा राडा रसिकांचं मात्र मनोरंजन करेल. ‘बिग बॉस मराठी’च्या या आठवड्यात घन:श्याम दरवडे, आर्या जाधव, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, निक्की तांबोळी, अरबाज पटेल आणि अभिजीत सावंत हे सात स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. आता या सात जणांमध्ये घराबाहेर कोण जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube