Bigg Boss Marathi: बीबी करन्सीसाठी BB फार्ममध्ये सदस्यांचा जोरदार राडा

Bigg Boss Marathi: बीबी करन्सीसाठी BB फार्ममध्ये सदस्यांचा जोरदार राडा

Bigg Boss Marathi New Season Day 39 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सहाव्या आठवड्याची सुरुवात झालेली आहे. (Bigg Boss Marathi New Season) पहिल्या दिवसापासून संपूर्ण घर ‘टीम A’ आणि ‘टीम B’ अशा दोन गटांमध्ये विभागलं गेलं होतं. (Bigg Boss Marathi) परंतु, गेल्या आठवड्यापासून सदस्यांमध्ये असलेल्या मैत्रीचं समीकरण काहीसं बदललं आहे. (BB Currency) आज बीबी करन्सीसाठी BB फार्ममध्ये (BB Farm) सदस्य जोरदार राडा करताना दिसत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi New Promo) आजच्या भागात सदस्य बी बी फार्ममध्ये राडा करताना दिसणार आहेत. बीबी फार्ममधून जास्तीत जास्त दूध गोळा करताना चांगलाच कल्ला करणार आहेत. कोणती टीम बीबी फार्ममधून दूध गोळा करण्यात बाजी मारेल याकडे सर्वांचं आता लक्ष लागलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


या टास्कमध्ये घरातील सर्वच सदस्य जोरदार राडा करताना दिसणार आहेत. त्यांचा हा राडा रसिकांचं मात्र मनोरंजन करेल. ‘बिग बॉस मराठी’च्या या आठवड्यात घन:श्याम दरवडे, आर्या जाधव, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, निक्की तांबोळी, अरबाज पटेल आणि अभिजीत सावंत हे सात स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. आता या सात जणांमध्ये घराबाहेर कोण जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्य आज BB फार्मचा कारभार सांभाळणार

‘बिग बॉस मराठी’च्या घरात नेहमीच रंगतदार टास्क पार पडत असतात. सदस्यांसाठी यंदाचा आठवडा खूपच कठीण आहे. या आठवड्यात घरात अनेक कठीण टास्क पार पडणार आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्य आज BB फार्मचा कारभार सांभाळणार आहेत. समोर आलेल्या प्रोमोमध्ये सदस्य BB फार्मचा कारभार सांभाळताना दिसत आहेत.

Bigg Boss Marathi: प्राणायाम, योगासनं अन्; हे आहे वर्षा ताईंच्या सौंदर्याचं रहस्य

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये घरातील सदस्य BB फार्मचा कारभार सांभाळताना दिसत आहेत. वैभव, अरबाज, सूरज, जान्हवी, घन:श्याम, निक्की, आर्यासह अनेक सदस्य आक्रमकपणे टास्क खेळत आहे. त्यांचा आक्रमकपणा पाहून बिग बॉस सदस्यांना चांगलीच शिक्षा सुनावणार आहेत. प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ म्हणत आहेत,”आक्रमकतेची शिक्षा म्हणून दोन्ही टीममधील एका सदस्याला बाद करण्यात येत आहे”.

‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या टास्कमधून दोन्ही टीममधले कोणते सदस्य बाद होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पण सदस्य BB फार्मचा कारभार सांभाळताना पाहून प्रेक्षकांचं मात्र चांगलच मनोरंजन होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube