Bigg Boss Marathi New Season Day 32 : ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi New Season) घरात नात्यांची समीकरण कधी बदलतील हे सांगू शकत नाही. (Bigg Boss Marathi) कोणी कधी प्रेमाला ठोकर मारतं तर कोण पस्तावतचं. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नेहमीच नात्यांची नवी समीकरण तयार होतात. (Bigg Boss Marathi Season 5 ) आता निक्की, अरबाज, अभिजीत यांच्याबाबतीतही नात्यांची नवी समीकरण तयार झाल्याचे दिसत आहेत.
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये (Bigg Boss Marathi New Promo) सूरज आणि आर्या निक्की, अरबाज, अभिजीत यांच्यातील नात्यांवर एक खास गाणं म्हणताना दिसून येत आहेत. (Bigg Boss Marathi New Season) त्यावर घरातील इतर सदस्यही मजा घेताना दिसत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज चांगलाच माहोल बनणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मात्र मनोरंजनाची मेजवानी पाहायला मिळणार आहे. निक्कीने टीम A ला रामराम केल्यानंतर तिला आता अभिजीतचा मोठा पाठिंबा मिळत आहे. आता किती दिवस निक्की आणि अभिजीतची जोडी एकत्र दिसेल याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. पण त्यांची दिल दोस्ती दुनियादारी मात्र लक्ष वेधून घेत आहे.
सूरजला पाहून पॅडी दादांनी केली कविता
नुकत्याच आलेल्या बिग बॉसच्या नव्या प्रोमोत (Bigg Boss Marathi New Promo) तुम्ही पाहू शकता की, सूरज (Suraj Chavan) अंकितला (Ankita Walawalkar) पाहून वर्षा ताईंना म्हणातो की, आई या वाहिनीला सांग जरा.. त्यावर अंकिता म्हणते की,” ओ भाऊजी ड्युटी सांभाळ तुमची. लावले की नाही सासू बाईंना कामाला.” त्यावर वर्षां ताई म्हणाल्या,” आता मी लावणार आहे सून बाईंना कामाला. त्यावर अंकीता म्हणते की, “मी काम करणारच नाही माझी मर्जी, माझे काम.” यावर सूरज म्हणतो की, सासूचे ऐकावे लागते. त्याचा तो हक्क आहे. यावर वर्षा ताई म्हणतात की,” मला कोणी काम कर असे सांगायला लागत नाही. मी माझी काम प्रेमाने करते. या सगळ्यां मस्करीवर पॅडी दादा म्हणतात,” भाऊजी भाऊजी मिठाचा खोका, भाऊजिंच्या मिशिवर बसला बोका.
Bigg Boss Marathi: ‘भाऊजी भाऊजी मिठाचा खोका’, सूरजला पाहून पॅडी दादांनी केली कविता
‘बिग बॉस मराठी’च्या घराची मी महाराणी’
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये (Bigg Boss Marathi New Promo) निक्की, वैभव आणि जान्हवीमध्ये झालेला राडा पाहायला मिळतोय. निक्की म्हणतेय,”बिग बॉस मराठीच्या घराची मी महाराणी आहे”. त्यावर जान्हवी म्हणते,”तू नोकराणी पण होऊ शकत नाहीस”. त्यावर निक्की वैभवला म्हणते,”कॅप्टन तरी तुम्ही होऊ शकता का?”. निक्कीला उत्तर देत वैभव म्हणतो,”न्हासके… बास कर”. त्यावर निक्की त्याला बच्चू म्हणते. पुढे वैभव निक्कीला म्हणतो,”तोंड दिलंय म्हणून काहीही बोलू नको. तुझी मस्ती जिरवली नाही ना तर बघ”.
‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांची बदललेली रूप पाहताना प्रेक्षकांना खूप मजा येत आहे. तर दुसरीकडे सदस्यांना बंधनात अडकलेलं पाहणंदेखील मनोरंजक ठरत आहे. आता आजच्या भागात नक्की काय होणार हे जाणून घेण्यासाठी आजचा भागच पाहावा लागणार आहे.