Bigg Boss Marathi: ‘भाऊजी भाऊजी मिठाचा खोका…’, सूरजला पाहून पॅडी दादांनी केली कविता

Bigg Boss Marathi: ‘भाऊजी भाऊजी मिठाचा खोका…’, सूरजला पाहून पॅडी दादांनी केली कविता

Bigg Boss Marathi New Season Day 31: बिग बॉसच्या घरात फक्त टास्क, भांडणे न होता.. (Bigg Boss Marathi New Season ) याशिवाय बऱ्याच चांगल्या मज्जा मस्तिने भरलेल्या गोष्टी देखील होतात. (Bigg Boss Marathi ) टास्क खेळणे हा गेम तर आहेच.. परंतु याशिवाय एकमेकांना प्रेमाने आपुलकीने बोलणे हे देखील बिग बॉसच्या घरात होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


नुकत्याच आलेल्या बिग बॉसच्या नव्या प्रोमोत (Bigg Boss Marathi New Promo) तुम्ही पाहू शकता की, सूरज (Suraj Chavan) अंकितला (Ankita Walawalkar) पाहून वर्षा ताईंना म्हणातो की, आई या वाहिनीला सांग जरा.. त्यावर अंकिता म्हणते की,” ओ भाऊजी ड्युटी सांभाळ तुमची. लावले की नाही सासू बाईंना कामाला.” त्यावर वर्षां ताई म्हणाल्या,” आता मी लावणार आहे सून बाईंना कामाला. त्यावर अंकीता म्हणते की, “मी काम करणारच नाही माझी मर्जी, माझे काम.” यावर सूरज म्हणतो की, सासूचे ऐकावे लागते. त्याचा तो हक्क आहे. यावर वर्षा ताई म्हणतात की,” मला कोणी काम कर असे सांगायला लागत नाही. मी माझी काम प्रेमाने करते. या सगळ्यां मस्करीवर पॅडी दादा म्हणतात,” भाऊजी भाऊजी मिठाचा खोका, भाऊजिंच्या मिशिवर बसला बोका.

‘बिग बॉस मराठी’च्या घराची मी महाराणी’

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये (Bigg Boss Marathi New Promo) निक्की, वैभव आणि जान्हवीमध्ये झालेला राडा पाहायला मिळतोय. निक्की म्हणतेय,”बिग बॉस मराठीच्या घराची मी महाराणी आहे”. त्यावर जान्हवी म्हणते,”तू नोकराणी पण होऊ शकत नाहीस”. त्यावर निक्की वैभवला म्हणते,”कॅप्टन तरी तुम्ही होऊ शकता का?”. निक्कीला उत्तर देत वैभव म्हणतो,”न्हासके… बास कर”. त्यावर निक्की त्याला बच्चू म्हणते. पुढे वैभव निक्कीला म्हणतो,”तोंड दिलंय म्हणून काहीही बोलू नको. तुझी मस्ती जिरवली नाही ना तर बघ”.

‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांची बदललेली रूप पाहताना प्रेक्षकांना खूप मजा येत आहे. तर दुसरीकडे सदस्यांना बंधनात अडकलेलं पाहणंदेखील मनोरंजक ठरत आहे. आता आजच्या भागात नक्की काय होणार हे जाणून घेण्यासाठी आजचा भागच पाहावा लागणार आहे.

Bigg Boss Marathi: ‘आपण जे करतो तेच आपल्याला मिळते..’, पॅडी दादांचा अभिजितला टोला

पॅडी दादांचा अभिजितला टोला

आज घरामध्ये पॅडी दादा अभिजीतला म्हणत आहेत की ,” तुझ्यावर जर अरबाजसारखी वेळ आली तर कॅप्टनसी दुसऱ्याला द्याची तर ती तू मला दे.. “त्यावर निक्की हसून म्हणते की ,” आता तर मी हक्काने म्हणू शकते की, तू माझा विचार कर.यासगळ्या वर अभिजित पॅडी दादांना म्हणतो की ,” मला तुमच्या सगळ्यांबद्दल मनात खूप प्रेम आहे. पण तुम्ही आता तसे नाही राहिलात. एखाद्या माणसाला जर तुम्हाला त्रास द्याचा असेल तर तुम्ही तो दिला आहे. तुम्ही निक्कीला देखील त्रास देत आहेत. आमच्या दोघानांपण टार्गेट केले जात आहे. त्यावर पॅडी दादा म्हणत आहे ,”आपण जे वागलो आहे तेच आपल्याला परत मिळत असते आणि आम्ही त्रास नाही देत गमंतीच करत आहोत जसे तू करायचास.”

follow us
  • fb
  • instagram
  • youtube