Download App

Bigg Boss Marathi: एकाहून एक जबरदस्त परफॉर्मन्स होणार; कोणता कल्लाकार सर्वोत्कृष्ट ठरणार?

Bigg Boss Marathi: 'बिग बॉस'च्या कल्ला टीव्हीवर तुफानी कल्लाकार धुडगूस घालणार आहेत. या कल्ला टीव्हीवर एकाहून एक जबरदस्त परफॉर्मन्स होणार आहेत.

Bigg Boss Marathi New Season Day 12 : ‘बिग बॉस मराठी’चा (Bigg Boss Marathi) आजचा दिवस ‘बिग बॉस’प्रेमींसाठी खूपच मनोरंजनात्मक असणार आहे. (Bigg Boss Marathi New Season) ‘बिग बॉस’च्या कल्ला टीव्हीवर तुफानी कल्लाकार धुडगूस घालणार आहेत. या कल्ला टीव्हीवर एकाहून एक जबरदस्त परफॉर्मन्स होणार आहेत. घरातील सर्वच एकापेक्षा एक सदस्य आपल्या जबरदस्त परफॉर्मन्सने प्रेक्षकांना वेड लावणार आहेत. आता यातून कोणता तुफानी कल्लाकार सर्वोत्कृष्ट ठरणार हे पाहावे लागेल.


अभिजीतची सुरेल ‘सुखाची श्रावणी’

सूरांचा बादशाह अभिजीत सावंतने (Abhijit Sawant) आपल्या आवाजाने सर्वांनाच वेड लावलं आहे. आज टेलिव्हिजनच्या लोकप्रिय सिंगिंग स्टारचा आवाजाची सुरेल ‘सुखाची श्रावणी’ ‘बिग बॉस मराठी’च्या घरातही अवतरणार आहे. ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन सुरू झाल्यापासून निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आणि अरबाज पटेलची जोडी ‘बिग बॉस’प्रेमींच्या आणि नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. आज निक्की आणि अरबाजच्या अदांवर सगळे फिदा होणार आहेत.

घरात वाहू लागलंय प्रेमाचं वारं

बारामतीचा रांगडा गडी वैभव चव्हाण आणि इरिना रूडाकोवा यांच्यात लव्ह केमिस्ट्री फुलू शकते, असे म्हटले जाऊ लागले. अशातच आता रॅपर आर्या देखील वैभवच्या प्रेमात पडल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आर्याचा हार्टब्रेक होणार की वैभव तिचं प्रेम स्वीकारणार? हे येणारा काळच ठरवेल. ‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये वैभव आणि इरिना मजा-मस्ती करताना दिसत आहेत.

Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’ च्या घरात वाहू लागलंय प्रेमाचं वारं; कोण पडलंय कोणाच्या प्रेमात?

दरम्यान वैभव म्हणतो,”कसली क्यूट आहे यार ही”. पण दुसरीकडे आर्या मात्र हार्टब्रेक झाल्याने ओक्साबोक्शी रडताना दिसत आहे. पुढे वैभव आर्याला विचारतो,”काय विषय आहे नक्की?”. त्यावर आर्या म्हणते,”मला तू नॅचरली अॅटरॅक्टिव्ह वाटतो”. यावर वैभव म्हणतो,”मी तर तुला असं कोणतं इंटेंशन दिलेलं नाही”. पण आर्या म्हणते,”मला होऊ शकतं अॅटरॅक्शन”.

‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या आठवड्यात पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, सुरज चव्हाण, निखल दामले, निक्की तांबोळी आणि घन:श्याम दरवडे हे सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता या सहा सदस्यांमधून या आठवड्यात कोण ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा निरोप घेणार हे पाहावे लागणार आहे.

follow us