BB Marathi : कॅप्टन अंकिता आणि घनःश्याममध्ये बाचाबाची; ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पुढे काय घडणार?

BB Marathi : कॅप्टन अंकिता आणि घनःश्याममध्ये बाचाबाची; ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पुढे काय घडणार?

Bigg Boss Marathi New Season Day 11 : ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi New Season) घराला अखेर पहिला कॅप्टन मिळाला आहे. (Bigg Boss Marathi) ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता प्रभू-वालावलकरला पहिली कॅप्टन होण्याचा बहुमान मिळाला आहे. ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन सुरू झाल्यापासून घरात निक्कीचीच चर्चा (Ankita Prabhu Walavalkar) आणि हवा होती. पण आता (Kokan Hearted Girl) अंकिता कॅप्टन झाल्याने यापुढे गेम चेंज झालेला पाहायला मिळेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


भांडी घासण्याच्या ट्रॉमावरुन अंकिता प्रभू-वालावलकरला पहिल्या आठवड्यात प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. (Ghanshyam Darwade) पण आता दुसऱ्या आठवड्यात हीच कोकणची चेडवा कॅप्टन झाल्याने तिचं सर्वत्र कौतुक होत आहे. आजच्या भागात अंकिता घरातील सदस्यांना कामे वाटताना दिसून येणार आहे. अंकिताने दिलेलं काम करण्यास घन:श्याम नकार देताना दिसून येईल.

‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात घन:श्याम अंकिताला म्हणतोय,”मला एकच कोणतं तरी काम दे”. त्यावर अंकिता म्हणतेय,”दोन कामे असतील तरी एकावेळी तुला एकच करायचं आहे”. त्यावर घन:श्याम वाद घालत म्हणतोय,”मला एकच काम दे”. अंकिता म्हणते,”एकावरच अन्याय नको म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. मला घरात कमी भांडणे हवी आहेत.” आता घन:श्याम नक्की काय काम करणार हे जाणून घेण्यासाठी आजचा भाग नक्की पाहा.

Bigg Boss Marathi : नॉमिनेशन कार्यात अभिजीत सावंत अन् छोटा पुढारी भिडले; कोण होणार नॉमिनेट?

बिग बॉसच्या घरात घन:श्यामने म्हणजेच छोट्या नेणे आपल्या हजरजबाबीपणाने लोकांची मने जिंकली आहेत. घन:श्याम सध्या अरबाज, निक्की, वैभव, जान्हवी यांच्या ग्रुपमध्ये वावरत आहे. पहिल्या कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये घरात जोरदार वादावादी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यानंतर आता अंकिता वालावलकर ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता कॅप्टन म्हणून वावरणार आहे. दिलेल्या जबाबदाऱ्या ती कशी पूर्ण करणार? कामे वाटताना घरातील सर्व सदस्यांना समान न्याय देईल का? तिला घरातील लोक साथ देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube