Download App

‘बिग बॉस मराठी’च्या घराची मी महाराणी’; निक्कीच्या वक्तव्यावर जान्हवी अन् अरबाज म्हणाले…

Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'च्या घरात दररोज नवा ड्रामा सुरू असतो. महिन्याभरातच निक्कीने (Nikki Tamboli) A टीमला रामराम केला आहे.

Bigg Boss Marathi New Season Day 31 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात दररोज नवा ड्रामा सुरू असतो. (Bigg Boss Marathi New Season) महिन्याभरातच निक्कीने (Nikki Tamboli) A टीमला रामराम केला आहे. (Bigg Boss Marathi ) भाऊच्या धक्क्यावर A टीमला ट्रॉफी उचलू न देण्याचं ओपन चॅलेंज निक्कीने दिलं आहे. बिग बॉस मराठीच्या घरात चक्रव्युहात अडकल्यानंतर निक्कीची खेळ खेळण्याची चक्र बदलली आहेत. टीम A मधल्या सदस्यांसोबत निक्की आज वाद घालताना दिसून येणार आहे.


‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये (Bigg Boss Marathi New Promo) निक्की, वैभव आणि जान्हवीमध्ये झालेला राडा पाहायला मिळतोय. निक्की म्हणतेय,”बिग बॉस मराठीच्या घराची मी महाराणी आहे”. त्यावर जान्हवी म्हणते,”तू नोकराणी पण होऊ शकत नाहीस”. त्यावर निक्की वैभवला म्हणते,”कॅप्टन तरी तुम्ही होऊ शकता का?”. निक्कीला उत्तर देत वैभव म्हणतो,”न्हासके… बास कर”. त्यावर निक्की त्याला बच्चू म्हणते. पुढे वैभव निक्कीला म्हणतो,”तोंड दिलंय म्हणून काहीही बोलू नको. तुझी मस्ती जिरवली नाही ना तर बघ”.

‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांची बदललेली रूप पाहताना प्रेक्षकांना खूप मजा येत आहे. तर दुसरीकडे सदस्यांना बंधनात अडकलेलं पाहणंदेखील मनोरंजक ठरत आहे. आता आजच्या भागात नक्की काय होणार हे जाणून घेण्यासाठी आजचा भागच पाहावा लागणार आहे.

पॅडी दादांचा अभिजितला टोला

आज घरामध्ये पॅडी दादा अभिजीतला म्हणत आहेत की ,” तुझ्यावर जर अरबाजसारखी वेळ आली तर कॅप्टनसी दुसऱ्याला द्याची तर ती तू मला दे.. “त्यावर निक्की हसून म्हणते की ,” आता तर मी हक्काने म्हणू शकते की, तू माझा विचार कर.यासगळ्या वर अभिजित पॅडी दादांना म्हणतो की ,” मला तुमच्या सगळ्यांबद्दल मनात खूप प्रेम आहे. पण तुम्ही आता तसे नाही राहिलात. एखाद्या माणसाला जर तुम्हाला त्रास द्याचा असेल तर तुम्ही तो दिला आहे. तुम्ही निक्कीला देखील त्रास देत आहेत. आमच्या दोघानांपण टार्गेट केले जात आहे. त्यावर पॅडी दादा म्हणत आहे ,”आपण जे वागलो आहे तेच आपल्याला परत मिळत असते आणि आम्ही त्रास नाही देत गमंतीच करत आहोत जसे तू करायचास.”

Bigg Boss Marathi: ‘आपण जे करतो तेच आपल्याला मिळते..’, पॅडी दादांचा अभिजितला टोला

अरबाजच्या फीलिंग झाल्या आहेत हर्ट

कालच्या भागात बिग बॉसने घरातील सदस्यांना जोंड्यांच्या बेडीत अडकवलं असून निक्की आणि अभिजीतची एक जोडी आहे. आता या जोडीमुळे निक्की आणि अभिजीतची मैत्री मुळेल का? असा प्रश्न बिग बॉसप्रेमींना पडला आहे. निक्की आणि अभिजीतची दिल दोस्ती दुनियादारी मात्र अरबाजला मात्र चांगलच खटकत आहे.

follow us