‘बिग बॉस मराठी’च्या घरातील पहिलाच आठवडा वादाचा; रॅपरनेच घेतला खलनायिकेसोबत पंगा

Bigg Boss Marathi 5: 'बिग बॉस मराठी ५' सुरु होऊन एकच आठवडा झाला आहे. पण पहिल्याच आठवड्यात घरातील दोन स्पर्धकांमध्ये मारामारी झाली आहे.

'बिग बॉस मराठी'च्या घरातील पहिलाच आठवडा वादाचा; रॅपरनेच घेतला खलनायिकेसोबत पंगा

'बिग बॉस मराठी'च्या घरातील पहिलाच आठवडा वादाचा; रॅपरनेच घेतला खलनायिकेसोबत पंगा

Bigg Boss Marathi New Season Day 6 : ‘बिग बॉस मराठी’चा (Bigg Boss Marathi) नवा सीझन नुकताचं सुरू झाला आहे. (Bigg Boss Marathi New Season) अल्पावधीतच या सीझनचं सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे. (BB Marathi) दररोज नवे सरप्राईज पाहायला मिळत आहेत. (Bigg Boss Marathi 5) तसेच एक्स्ट्रा धमाल, एक्स्ट्रा मस्ती, एक्स्ट्रा गॅासिप्स, एक्स्ट्रा मसाला आणि एक्स्ट्रा भव्यता अशा सर्व गोष्टी यंदाच्या सीझनमध्ये पाहायला मिळत आहेत. (Bigg Boss Marathi)


पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्य एकमेकांसोबत चांगलेच भिडताना दिसत आहेत. आता आजच्या एपिसोडमध्येही जान्हवी किल्लेकर (janhavi killekar) आणि आर्या जाधव (Arya Jadhav) यांच्यात कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळालं.

‘बिग बॉस मराठी’चा नवा धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये जान्हवी आणि आर्या एकमेकींसोबत नडताना दिसून येत आहे. जान्हवी-आर्यामध्ये धक्काबुक्की झालेलीदेखील पाहायला मिळत आहे. दरम्यान जान्हवी म्हणते,”नॉमिनेशनदरम्यान आर्या किती फडफड करत होती”. त्यावर आर्या म्हणते,”माझ्यामध्ये तुम्ही आता येऊ नका”. तर जान्हवी आर्याला म्हणते,”किती दिवस ‘बिग बॉस मराठी’च्या घरात राहतेस ना तेच बघते मी”. त्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालेलं पाहायल मिळत आहे.

https://www.youtube.com/watch?v=wxSI5D9EsM8

आर्या आणि जान्हवीचा प्रोमोमधील पंगा पाहून ‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात काय घडतंय हे बघण्याची प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच वाढली आहे.

BB Marathi: सूरज कोणालाच नाही भीत, आपल्या युनिक स्टाईलने गोलीगत होणार टॉपचा किंग!

‘हे’ सदस्य झालेत नॉमिनेट

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमधील पहिल्या आठवड्यात सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यात वर्षा उसगांवकर, योगिता चव्हाण, अंकिता प्रभू-वालावलकर, सूरज चव्हाण आणि कोल्हापूरच्या पुरुषोत्तमदादा पाटील या सदस्यांचा समावेश आहे. आता या सहा सदस्यांमधून कोण ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा निरोप घेणार हे पाहावे लागणार आहे.

Exit mobile version