Download App

Bigg Boss Marathi: लसणाच्या ठेच्यासारखा निक्कीचा राग; अरबाज पचवू शकेल का?

Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठी'च्या घरात टास्कदरम्यान पॅडी, योगिता, सूरज, निखिल, निक्की आणि घन:श्याम हे घरातील सदस्य नॉमिनेट झाले.

Bigg Boss Marathi Day 13 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील (Bigg Boss Marathi) सदस्यांनी नॉमिनेशन टास्कदरम्यान आवश्यक किराणा सामान विकत घेतला. (Bigg Boss Marathi New Season) या टास्कदरम्यान (Paddy Kamble) पॅडी, योगिता, सूरज, निखिल, निक्की आणि घन:श्याम हे घरातील सदस्य नॉमिनेट (Nominated) झाले. नॉमिनेट झाल्याने निक्कीचा राग अनावर झाल्याचे बघायला मिळाले आहे. आता लसणाच्या ठेच्यासारखा निक्कीचा राग अरबाज पचवू शकेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.


‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (Bigg Boss Marathi New Promo) या प्रोमोमध्ये अरबाजमुळे निक्की प्रचंड तापलेली दिसत आहे. वैभव आणि जान्हवी निक्कीला समजावत दिसत आहे. दरम्यान ‘तुला वाचवण्यासाठीच अरबाज प्रयत्न करत होता’, असं वैभव निक्कीला म्हणत आहे. त्यावर निक्की म्हणते की, गेलं खड्ड्यात…एवढं प्रेम दाखवूनदेखील मी नॉमिनेट झाली आहे.’

पॅडीने केली अभिजीतची नक्कल, सदस्यांनी केली धमाल

‘बिग बॉस मराठी’च्या घरात पॅडीने अभिजीतची नक्कल केली आहे. अभिजीतची नक्कल करत पॅडी म्हणतोय, हे बघा मित्रांनो.. आपण आज इथे आलो आहोत तर आपल्याला टिकून राहणं खूप गरजेचं आहे. गाणं ऐकूण तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करू नका. शक्ती आहे तर आपल्याकडे युक्ती आहे. दरम्यान घरातील इतर सदस्य धमाल करताना पाहायला मिळत आहेत.

Bigg Boss Marathi: गोलीगत सूरजला ‘बिग बॉस मराठी’ चा गेम कळला नाही, पण त्याला माणसं कळली

सूरजला गेम कळला नाही, पण त्याला माणसं कळली

गोलीगत सूरजला ‘बिग बॉस मराठी’चा खेळ कळलाच नाही, अशी चर्चा होऊ लागली आहे. मात्र त्याने स्वत:वर मेहनत घेतली आणि आपला खेळ दाखवायला सुरुवात केली. वीकेंडला भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने देखील सूरजच्या खेळीचं कौतुक केलं. तसेच त्याला यापुढेही गोलीगत पॅटर्नने खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं.

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये गोलीगत सूरज चव्हाण गार्डन एरियामध्ये केर काढताना दिसत आहे. त्यावर ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता प्रभू वालावलकर आणि हास्यसम्राट पंढरीनाथ कांबळे चर्चा करताना दिसत आहेत. अंकिता म्हणतेय,”सूरजला असं बघून मला कसंतरी वाटतं”. त्यावर पॅडी म्हणतो, ‘बिचारा बाहेर देखील हेच काम करत असेल. तो काल मला म्हणालेला, दादा मला खूप वाईट वाटतं मी वर झोपतो आणि तुम्ही खाली झोपता’. त्यावर अंकिता म्हणते, ‘सूरजला गेम कळला नाही, पण माणसं कळली’.

follow us