Download App

Bigg Boss Marathi : भाऊ इज बॅक! रितेश देशमुख यांच्या शेवटच्या ‘भाऊच्या धक्क्या’ची महाराष्ट्राला प्रतीक्षा

Bigg Boss Marathi 5 : हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारे सुपरस्टार रितेश देशमुख गेल्या काही दिवसांपासून 'बिग बॉस मराठी'मुळे चांगलेच चर्चेत आहेत.

Riteish Deshmukh Bigg Boss Marathi Season 5 : हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारे सुपरस्टार रितेश देशमुख गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस मराठी’मुळे चांगलेच चर्चेत आहेत. (Bigg Boss Marathi Season 5) या बहुचर्चित कार्यक्रमाच्या होस्टिंगची धुरा महाराष्ट्राचे लाडके रितेश भाऊ सांभाळत आहेत. (Bigg Boss Marathi ) सदस्यांना पाठिशी घातल्याने, त्यांचं कौतुक केल्याने तर कधी त्यांची पाठ थोपटल्याने रितेश यांचा ‘बिग बॉस मराठी’मधला ‘भाऊचा धक्का’ (Bhau Cha Dhakka) चर्चेत राहिला. याचे परिणाम टीआरपीतही दिसले आहेत.


नॉन-फिक्शन कार्यक्रमांमध्ये सर्वाधिक पाहिला जाणारा शो म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले जात आहे. गेले दोन आठवडे रितेश भाऊ परदेशी चित्रिकरणासाठी गेल्याने त्यांना ‘भाऊचा धक्का’ करता आला नाही. पण आता मात्र भाऊ इज बॅक! रितेश भाऊंच्या (Riteish Deshmukh) शेवटच्या ‘भाऊच्या धक्क्या’ची संपूर्ण महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे.

‘भाऊच्या धक्क्या’वर गेले दोन आठवडे रितेश भाऊंची कमतरता जाणवली. त्यांची सदस्यांची शाळा घेण्याची हटके शैली आणि कल्ला प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातलं चावीचं माकड, घरातलं डोअरमॅट अशा अनेक उपमा त्यांनी सदस्यांना दिल्या. सोशल मीडियावर याचे मीम्सदेखील व्हायरल झाले. एका ‘भाऊच्या धक्क्या’नंतर दुसऱ्या ‘भाऊच्या धक्क्या’ला काय होणार? रितेश भाऊ काय धमाका करणार याची संपूर्ण महाराष्ट्रालाच प्रतीक्षा असायची. आता ‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड फिनालेला धुमाकूळ घालण्यासाठी रितेश भाऊ सज्ज आहेत.

Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रँड सेलिब्रेशन होणार!

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा मंच सुपरस्टार रितेश देशमुख यांनी दणाणून सोडला आहे. रितेश भाऊंनी आपल्या खास स्टाइलने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. भाऊच्या धक्क्यावर सदस्यांचा योग्य पद्धतीने हिशोब घेण्यात रितेश भाऊ यशस्वी झाले आहेत. ‘बिग बॉस मराठी’चा यंदाचा सीझन खूपच वेगळा असून इतर सीझनपेक्षा अनेक हटके गोष्टी यंदा पाहायला मिळत आहेत. ग्रँड फिनालेदेखील असाच दमदार सरप्राईजने भरलेला असेल. या ग्रँड फिनालेला रितेश भाऊ काय धमाका करणार याची प्रेक्षकांना आता प्रतीक्षा आहे.

follow us