Bhaucha Dhakka BB Marathi: बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांना धक्का द्यायला रितेश भाऊ सज्ज!

Bhaucha Dhakka BB Marathi: बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांना धक्का द्यायला रितेश भाऊ सज्ज!

Bigg Boss Marathi New Season Day 28 : ‘बिग बॉस मराठी’चा चौथा आठवडा खूपच धमाकेदार होता. (Bigg Boss Marathi New Season) घरातील सदस्यांमध्ये वाद, रडारडी, भांडणं, पाहायला मिळाली. (Bigg Boss Marathi ) घरातील काही सदस्यांचं खूप कौतुक झालं तर काहींना मात्र नेटकऱ्यांनी चांगलच ट्रोल केलं. आठवडाभरात सदस्यांनी केलेल्या राड्यावर रितेश भाऊ (Ritesh Deshmukh) आता सदस्यांची शाळा घेताना दिसून येणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi New Promo) या आठवड्यात नॉमिनेशनची (Nomination) चूल पेटली आणि हाऊसफूल एन्टरटेनमेंट झालं. कोणी कोणाला धूळ चारली तर कोणाची बत्ती गूल झाली. (Bhaucha Dhakka Bigg Boss Marathi) आता आठवड्याभरातील या सर्व गोष्टींवर चर्चा करुन रितेश भाऊ सदस्यांना जोरदार भाऊचा धक्का द्यायला आता सज्ज आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या या आठवड्यात सत्याचा पंचनामा झाला, नॉमिनेशची चूल पेटली. अशा अनेक गोष्टींदरम्यान घरातील सदस्यांनी हा आठवडा चांगलाच गाजवला आहे. काहींकडून गंभीर चूका झाल्या असून सदस्यांना रितेश भाऊ आता या चूका दाखवून देणार असल्याचे पाह्यला मिळणार आहे.

छोट्या पुढारीची अरबाजला एक छोटीशी रिक्वेस्ट

‘बिग बॉस मराठी’च्या नवा प्रोमो खूपच गंमतीशीर आहे. (Bigg Boss Marathi New Promo) या प्रोमोमध्ये छोटा पुढारी अरबाजला एक छोटीशी रिक्वेस्ट करत म्हणतोय,”अंघोळीला लवकर जा म्हणतोय तरी जात नाहीस”. छोटा पुढारीला उत्तर देत अरबाज म्हणतो,”नाही जाणार मी अंघोळीला… माझी अंघोळ झाल्यानंतरच तू जायचं अंघोळीला”. त्यावर घन:श्याम म्हणतोय,”स्वत:ही जात नाहीस आणि मलादेखील जाऊ देत नाही”. पुढे अरबाज आणि छोटा पुढारीच्यामध्ये पडत सूरज म्हणतो,”तुमच्या नादात खूप वेळ वाया जातोय”. त्यानंतर अरबाज अंघोळीला जातो. दरम्यान छोटा पुढारी म्हणतो,”माझा भाऊ करुदेतना आम्हाला अंघोळ”. पुढे अरबाज त्याला प्रश्न विचारतो,”आता कसं वाटतंय”. अरबाज आणि घन:श्याम अनेकदा एकमेकांसोबत धमाल करताना दिसून येतात. त्यांची ही धमाल प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरते. आजच्या भागातही प्रेक्षकांना त्यांचा हा गंमतीशीर अंदाज पाहायला मिळणार आहे.

Bigg Boss Marathi: छोट्या पुढारीची अरबाजला एक छोटीशी रिक्वेस्ट; म्हणतोय, ‘मला जाऊ द्याना

डीपीने निक्कीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत घातलं गाऱ्हाणं

निक्कीला शुभेच्छा देत डीपी दादा म्हणत आहेत, (Bigg Boss Marathi New Promo) “वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा. 75 वर्षे जग.. तुझं असचं तारुण्य टिकूदेत. लोकांना छळू नकोस. त्यांना त्रास देऊ नकोस. लोकांच्या नरड्यावर उभं राहून जिंक. पण कोणाला काही मानसिक त्रास देऊ नकोस. तुला वाढदिवसाच्या कोटी-कोटी शुभेच्छा…शुभेच्छूक साधासुधा एक पलिकडच्या ग्रुपमधला गरीब माणूस”. आजच्या भागात निक्की डीपी दादांना सांगते,”मला वीट आलाय. माझा सर्वोत्कृष्ट वाढदिवस साजरा केल्याबद्दल मी ‘बिग बॉस’ला धन्यवाद म्हणते. माझे डोळे उघडलेत. टॉपला जायचं तर एकत्र जाऊयात. मी एखाद्याला निवडलं ना तर त्याच्यासाठी मी सर्वांसोबत लढू शकते. पण समोरच्याला या गोष्टी कळल्या पाहिजेत. अभिजीत मला समजून घेतो”. एकंदरीतच निक्कीला अभिजीतचा प्रचंड राग आलेला आहे. याबद्दल घरातील इतर सदस्यांकडे ती व्यक्त होताना दिसून येते.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube