Bigg Boss Marathi Season 5 Day 44: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नेहमीच (Bigg Boss Marathi Season 5) गंमतीजमती होत असतात. टास्क, वाद, भांडणासोबत सदस्य एकमेकांसोबत मजा-मस्ती करताना अनेकदा दिसून येतात. (Bigg Boss Marathi ) आजच्या भागात साध्या चिप्ससाठी अरबाज (Arbaaz Patel) वर्षा ताईंना (Varsha Tai) मस्का लावताना दिसणार आहे. अरबाज आणि वर्षा ताईंची मजा-मस्ती पाहताना प्रेक्षकांना मात्र मजा येत आहे.
बिग बॉस मराठीच्या समोर (Bigg Boss Marathi New Promo) आलेल्या प्रोमोमध्ये वर्षा ताई त्यांचा ठसका दाखवताना दिसत आहेत. तर दुसरीकडे अरबाज मात्र त्यांना भरपूर मस्का लावतोय. प्रोमोमध्ये वर्षा ताई चिप्स खास आहेत. तर अरबाज चिप्ससाठी त्यांच्या मागे लागलेला दिसत आहे. त्यावर वर्षा ताई अरबाजला मस्का लावण्यासाठी सांगत आहेत. वर्षा ताई अरबाजला म्हणत आहेत,”मी जगातली सगळ्यात सुंदर व्यक्ती आहे असं म्हण”. त्यावर अरबाज म्हणतो,”सगळ्यात सुंदर स्त्री आहात तुम्ही”. पुढे वर्षा ताई म्हणतात,”निक्की आणि मी भांडत असताना नेहमी मी तुमची बाजू घेणार असं म्हण”. त्यावर अरबाज म्हणतो,”नेहमी तुमची आणि तिची बाजू घेणार ताई”. त्यानंतर सर्वत्र एकच हशा पिकतो.
‘बिग बॉस’ने मला जमिनीवर आणलं : निक्की तांबोळी
‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात साडीमुळे निक्कीचं चहाचं भांडं खाली पडतं. त्यामुळे निक्की भांडं उचलत म्हणते,”बिग बॉस तुम्ही मला कुठे जमिनीवर आणलं आहे? हा काय प्रकार आहे? चहा बनवण्याच्या चक्करमध्ये हे झालं आहे. वर्षा ताई पुढे म्हणतात,”नवीन निक्कीचं दर्शन दिल्याबद्दल बिग बॉसचे आभार”.
Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आर्या- अभिजीत खेळले मजेदार रॅपिड फायर
वाइल्ड कार्ड म्हणून घरात यायला हवी आहे पोरगी
‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात घरात संग्राम चौगुले एन्ट्री घेताना दिसणार आहे. पण त्याआधी सूरज मात्र त्याच्या अपेक्षांबद्दल बोलताना दिसून येईल. वाइल्ड कार्ड म्हणून सूरजला घरात एक मुलगी यायला हवी आहे. त्यामुळे घरातील सदस्य त्याची चांगलीच खेचखेची करताना दिसत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात वैभव अंकिताला म्हणतोय की सूरज बोलतोय,”कोणीतरी मुलगी आली तर मजाच आहे”. त्यावर अंकिता सूरजला म्हणते,”तू चुकीचा गेम समजत आहेस..थंड घे”. त्यावर निक्की मात्र सूरजला पाठिंबा देते. दरम्यान प्रेक्षकांना लाजतानाचा सूरज पाहायला मिळेल. डीपी दादा सूरजला आश्वासन देतो की,”घरात मुलगी आली तर तिच्यासोबत तुझं प्रेमप्रकरण मी पूर्ण करून देईल”.