Bigg Boss Marathi: ‘घोडा लावायचा नाही रे… ‘, सुरजच्या लग्नाचे घनश्यामला टेन्शन
Bigg Boss Marathi New Season Day 41 : ‘बिग बॉस मराठी’चे नवे पर्व चांगलेच गाजाताना आपल्याला दिसत आहे. (Bigg Boss Marathi New Season) या नव्या पर्वावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले आहे. (Bigg Boss Marathi New Promo) तसेच बिग बॉसच्या घरात सदस्स एकमेकांवर प्रेम ही करतात आणि टास्कमध्ये एकमेकांविरोधत उभे देखील राहतात. आजच्या भागात गार्डन एरियात सुरज (Suraj Chavan) आणि घनश्याम (Chota Pudhari) यांच्यामध्ये सुरजच्या लग्नाची चर्चा होत आहे. आजच्या UNSEEN UNDEKHA मध्ये प्रेक्षकांना हे पाहता येईल.
View this post on Instagram
घनश्याम सुरजला म्हणतोय की, ” तूझ्या लग्नात करवला नको का? मग मी आहे ना.. मग तूझ्या लग्नात आपल्याला तूझ्या आवडीचे कपडे घ्यायला लागणार. आम्हाला वहिनी पाहिजे बाबा.. मेकअप करायला.. आम्हाला हक्काची वहिनी हवी आहे. तुला एवढे शॉपिंगचे समजत नाही आमची वहिनी आम्हाला सांगेल भाऊजी ही बूटे घ्या. तुझ लग्न एकदम दणक्यात करायचे. डिजे लावायचा, घोडा लावायचा… त्यावर सुरज म्हणतो, “घोडा लावायचा नाही.. घोडा नाचवायचा रे.” नंतर घनश्याम म्हणतो ,”अरे घोडा असा आणायचा त्यावर तू बसायचे. घोडा असा मस्त नाचनारा असला पाहिजे..फक्त तुला पाडले नाही पाहिजे. सगळा खर्च आपण करू. नवरीकडच्या लोकांनी खर्च नाही केला तरी चालेले आणि सगळ्यांत महत्वाचे वहिनी आम्ही ठरवणार तू नाही ठरवायची.
आम्ही बघू आम्हाला वहिनी कशी हवी ते. ” घनश्याम सुरजला विचारतो की, “तुझ्या लग्नात मी किती दिवस आधी येऊ?” त्यावर सूरज म्हणतो, ” एक महिना आधी ये तू. घालू मस्त राडा आपण. आजच्या UNSEEN UNDEKHA मध्ये घनश्यामला सुरजच्या लग्नाची किती काळजी आहे. हे आपल्याला पाहता येईल. बिग बॉसच्या घरात अश्या अनेक गमंती -जमंती आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
Bigg Boss Marathi : सूरजवर जळतोय पॅडी दादा; नेमकं प्रकरण काय?
सुरजने सांगितली लव्ह स्टोरी
आजच्या भागात गार्डन एरियात पॅडी, सुरज ,अभिजित, आर्या आणि अंकिता हे बोलताना दिसत आहे. सुरज बाकीच्या सदस्यांना त्याच्या मूव्हीच्या शूटिंग दरम्यान झालेली गंमत सांगत आहे. सुरज सांगतोय की ,” मी एकदा शूटिंग करत असताना मला शूटींगच्या वेळी एक मुलगी आवडली होती. वाईच्या इथे आम्ही रूम बुक केली आणि आम्ही त्या रूममध्ये राहिलो. मी तिला पाहण्यासाठी सारखा रुमच्या बाहेर येत होतो. ती पण बाहेर येऊन मला पाहात होती.
त्यानंतर पॅडी म्हणाले की ” तुला कसे माहिती की, ती तुला बघून लाइन देत होती ?” त्यावर सुरज म्हणाला की , आम्ही फक्त एकमेकांकडे पाहायचो. मग मी तिला सांगितले की, तू मला खूप आवडते. पण हा सीन मधला डायलॉग होता. मला तिला प्रपोझ हाणायचा होता. मला तिच्या हातामध्ये गुलाब दयायचे होते. मी तिला म्हणालो तू माझ्यसाठी लई स्पेशल आहेस. हे घे स्पेशल चॉकलेट. माझा बच्चा.. ” त्यावर पॅडी यांनी विचारले की, “तू असे लाडात येऊन बोललास त्यावर तिचे काय उत्तर होते.” यावर सुरज म्हणाला, ” ती म्हणाली मला दुसरा मुलगा आवडतो. मग माझ्या दिलाचे चूर चूर तुकडे झाले.” यावर अंकिता म्हणाली की ” तुझ्या दिलाचे किती तुकडे झाले असतील मोजता येणार नाही.”