Download App

BB Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज रंगणार कॅप्टन्सी टास्क; अरबाजवर भारी पडणार का संग्राम?

Bigg Boss Marathi Season 5 Day 46 : 'बिग बॉस मराठी' हा शो (Bigg Boss Marathi Season 5) अनेक प्रेक्षकांना आवडत आहे.

Bigg Boss Marathi Season 5 Day 46 : ‘बिग बॉस मराठी’ हा शो (Bigg Boss Marathi Season 5) अनेक प्रेक्षकांना आवडत आहे. आजच्या एपिसोडमध्ये बिग बॉस मराठीच्या घरात (Bigg Boss Marathi) नवीन टास्क आणि नवीन राडा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आज बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सी टास्क (Captaincy task) पार पडेल. या टास्कदरम्यान (Sangram Chougule) घरात सदस्यांमध्ये चांगलाच कल्ला, राडा, आणि गोंधळ होताना दिसेल.


‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर (Bigg Boss Marathi New Promo) आला आहे. या आठवड्यात कोणत्या सदस्यांना कॅप्टन पदाची उमेदवारी मिळणार आणि कोण होणार घराचा कॅप्टन याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. गोण्यांमध्ये कापूस भरण्याचा हा कॅप्टन्सीचा टास्क आहे. कॅप्टन्सीच्या उमेदवारीत कोण पात्र आणि कोण अपात्र ठरणार हे पाहावे लागेल. टास्क जिंकूण कोण कॅप्टन होणार हे पाहावे लागणार आहे.

पॅडी भाऊंचा सूरजला सल्ला

संग्रामच्या येण्याने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रत्येक जण प्लँनिंग करण्यामागे लागले आहेत. प्रत्येक सदस्याच्या डोक्यात नवा गेम शिजत आहे. या वीकचा कॅप्टन सूरज असून तो आता घरातच ताबा उचलण्याचा प्रयत्न करत आहे. आजच्या UNSEEN UNDEKHA मध्ये, तुम्ही पाहू शकता की, पॅडी भाऊ सूरजला काही गेम बद्दल सल्ला देत आहेत. पॅडी म्हणतात की ,” कुठल्या गोष्टींवर नॉमिनेट करायचे हे मी आता तुला सांगतो. जर मागील आठवड्याच्या निकषावर असे म्हटले तर, मागच्या आठवड्यात ज्या ज्या गोष्टी झाल्या. कोणती माणसे चुकीचे वागलीत मग त्यांना नॉमिनेट करायचे. जर गेम बद्दल म्हणाले तर, मागच्या आठवड्यात जे खेळ झाले. खेळात कोण चुकीचे वागले. हे तू डोक्यात फिट करून ठेव. सूरज त्यावर म्हणाला की ,”असे तुम्ही मला रोज सांगता जा.” त्यावर पॅडी म्हणाले, ” हो मी सांगतो. हे सगळे सल्ल्याचे पैसे मी लिहून ठेवणार.

Bigg Boss Marathi : अभिजीत-वैभवमध्ये राडा; निक्की अन् अभिजीतच्या मैत्रीत येणार दुरावा?

एका दिवसाचे 10 हजार आणि जर तुला पटत नसेल तर जा निक्कू ताईकडे ती देईल तुला सल्ले. घनश्याम नंतर आता तूच आहेस. तिच्या कडे मसाज करायला बरोबर जातोस तू.” त्यावर सुरज म्हणाला,” निक्कू ताई ही घनश्यामची कॉपी आहे माझी नाही. तिने मला बोलावले होते की ये डोक्याची मसाज करते.” त्यावर पॅडी म्हणाले,” की उदय ती तुला बोलले की या लोकांना नॉमिनेट कर ही कारणे देऊन. तू करशील का मग? ती हे पण बोलले की मी तुझी मसाज केली तू मला करू नकोस मग काय करणार तू? त्यावर सुरज म्हणाला ,” मला नाही आवडत ती. माझे काही विचार आहेत की नाही? मी माझ्या स्वतःच्या मनाचे ऐकणार. कोणाचे पण ऐकून मी कोणाला नॉमिनेट करणार नाही.

follow us