Download App

Bigg Boss Marathi: आर्याच्या चुकीचा होणार पंचनामा, बिग बॉस देणार मोठी शिक्षा?

Bigg Boss Marathi Season 5 Day : 'बिग बॉस मराठी'च्या घरात नुकताच पार पडलेल्या कॅप्टनसी टास्कने सर्वांनाच मोठा धक्का दिलाय.

Bigg Boss Marathi Season 5 Day 48 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात (Bigg Boss Marathi Season 5) नुकताच पार पडलेल्या कॅप्टनसी टास्कने (Captaincy Task) सर्वांनाच मोठा धक्का दिलाय. कॅप्टनसी टास्कदरम्यान आर्याने (Aarya Jadhav) निक्कीच्या (Nikki Tamboli ) कानशिलात लगावल्याने बिग बॉस तिला काय शिक्षा देणार याकडे प्रेक्षकांचं आता लक्ष लागलं आहे. कॅप्टनसी पदाच्या (Bigg Boss Marathi) टास्कदरम्यान जादुई हिरा मिळवण्याची धडपड करताना हा प्रकार घडला आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ म्हणत आहेत,”घरात आर्या आणि निक्की यांच्यामध्ये एक निंदनीय घटना घडली. आर्या यांनी हे निंदनीय कृत्य करुन बिग बॉसच्या मुलभूत नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे बिग बॉस आर्या यांना आता शिक्षा ठोठावत आहे”. निक्कीच्या कानशिलात लगावत आर्याने ‘बिग बॉस’च्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे बिग बॉस आर्याला काय शिक्षा ठोठावणार? हे जाणून घेण्याची सर्वांनाच आता उत्सुकता आहे. कानशिलात लगावल्यानंतर निक्कीने बिग बॉसला आर्याला घरी पाठवा अशी विनंती केली होती. आता बिग बॉस काय निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे.

आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली

बिग बॉस मराठी’चं घर म्हटलं की टास्क, मजा-मस्तीसह वाद, आरडाओरडा, भांडण, तंटा हे सगळं काही आलंच. या नव्या पर्वानेही अक्षरशः धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. नव्या पर्वात आर्या आणि निक्की अनेकदा एकमेकांसोबत वाद घालताना दिसून आल्या आहेत. पण आज त्यांच्या वादाने उच्चांक गाठला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज कॅप्टन्सीचा टास्क पार पडणार आहे. या टास्कदरम्यान आर्या व निक्कीमध्ये जोरदार खडाजंगी झाली आणि नंतर आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अशा प्रकारचं कृत्य अमान्य आहे. बिग बॉसदेखील याचा निषेध करतात. कॅप्टन्सीवरुन आर्या आणि निक्कीची जोरदार जुंपली आहे. निक्कीच्या कानशिलात लगावत आर्याने ‘बिग बॉस’च्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे बिग बॉस आर्याला काय शिक्षा ठोठावणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात रंगलीय वर्षा ताईंची चर्चा; काय आहे कारण ?

कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या कॅप्टन्सी पदाच्या टास्कदरम्यान जादुई हिरा मिळवण्यासाठी अंकिता, वर्षा ताई, जान्हवी, निक्की आणि आर्या यांच्यात चढाओढ झाली. यात जादुई हिरा मिळवण्याच्या झटापटीत आर्या व निक्की यांच्यात जोरात जुंपली. निक्की आणि आर्याच्या या भांडणाचे रूपांतर नंतर झटापटीत आणि त्यानंतर कानफटीत खेचण्यापर्यंत झाले. बिग बॅास यांनी आर्याच्या या कृत्याचा निषेध केला असून यात तिला काय शिक्षा होईल , हे उद्याच्या भागात कळेलच. आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावल्यानंतर निक्की ‘बिग बॉस’ला सांगत आहे की,”आर्याने मला मारलंय.. मी हे सहन करू शकत नाही”. त्यावर आर्या म्हणतेय,”मला काही घेणं देणं नाही. मला जेल मध्ये पाठवा नाहीतर घरी पाठवलं तरी चालेल”.

follow us