Download App

Bigg Boss Marathi: ‘दम असेल तर मला बाहेर काढून दाखव’; जान्हवीचं निक्कीला चॅलेंज

Bigg Boss Marathi Season 5 Day 48 : 'बिग बॉस मराठी'ची (Bigg Boss Marathi Season 5 ) सध्या तुफान चर्चा सुरू असलेली पाहायला मिळत आहे.

Bigg Boss Marathi Season 5 Day 48 : ‘बिग बॉस मराठी’ची (Bigg Boss Marathi Season 5 ) सध्या तुफान चर्चा सुरू असलेली पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi ) कधी काय होईल याचा काही अंदाज नाही. या घरातील सदस्यांची नात्याची समीकरणं ही नेहमी बदलताना दिसतात. निक्की तांबोळी (Nikki Tamboli ) आणि जान्हवी किल्लेकरची (Janhavi Killekar ) घट्ट मैत्री सुरुवातीचे काही दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळाली. पण नंतर त्यांच्या मैत्रीत फूट पडली. आता त्यांच्यात जोरदार वादावादी झालेली पाहायला मिळणार आहे.


कॅप्टनसीवरुन निक्की आणि जान्हवीमध्ये जोरदार भडका उडाला आहे. दोघी एकमेकांना चॅलेंज देताना आजच्या भागात दिसतील. समोर आलेल्या प्रोमोमध्ये जान्हवी निक्कीला म्हणतेय,”दम असेल तर मला बाहेर काढून दाखव..चॅलेंज आहे”. त्यावर निक्की म्हणते,”कॅप्टनसीमधून तिला काढलं याचा राग आलाय तिला”. जान्हवी पुढे म्हणते,”या घरात सगळ्यांना तू घाण झाली आहेस”.

अरबाज आणि वैभव करतायत जान्हवीबद्दल चर्चा

वैभवला अरबाज म्हणतोय,”आता तू माझं दुसरं रूप बघशील. जान्हवीने माझ्यावर आरडाओरडी केली. टास्कदरम्यान तिने मला खूप इरिटेड केलं आहे. मला खूप काही बोलली. जान्हवी आपल्यासाठी खेळतेय हे माझ्या मनात आलं नाही”. वैभव पुढे अरबाजला सांगतो जान्हवीने माझ्यासाठी खेळण्याला होकार दिला होता. अरबाज पुढे म्हणतो,”वैभवला उडवायचं असं ती सगळ्यांना म्हणाली होती”.

Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात रंगलीय वर्षा ताईंची चर्चा; काय आहे कारण ?

कॅप्टनसी टास्कमध्ये निक्की झाली हतबल

एकीकडे आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली आहे. तर दुसरीकडे कॅप्टन न होता आल्याने निक्की हतबल झाली आहे. हतबल झालेल्या निक्कीवर ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्य चर्चा करताना दिसणार आहेत. जान्हवी म्हणतेय,”मला ट्रॉफी मिळो किंवा नको मिळूदेत पण मला निक्कीचा गर्व उतरवायचा आहे”. त्यावर पॅडी दादा म्हणतात,”तिचा गर्व उतरलाय.. हतबल झाली आहे ती आता”. अंकिता म्हणतेय,”आम्ही तिला सांगत होतो फुटेज देऊ नको आम्हाला तू बाहेर जा”.

अरबाजने केलाय जान्हवीचा गेम

‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात जान्हवी आणि अभिजीत अरबाजबद्दल चर्चा करताना दिसणार आहेत. जान्हवी म्हणतेय,”अरबाजला मला काहीतरी मोठं काम द्यायचं होतं. माझी टीम जर तयार असेल तर मी करेल असं मी त्याला म्हणाले होते”. अभिजीत म्हणतो,”मागच्या आठवड्यात तिकडे सुरू होतं ते आता तुझ्यासोबत सुरू आहे”. जान्हवी म्हणते,”करुदेत..माझ्याकडे सगळ्याची उत्तरं आहेत. कॅप्टनसी पदाच्या उमेदवारीतून मला काढण्यात आलंय. मी त्याला का आता सेफ करावं”.

follow us