Download App

Bigg Boss Marathi: अरबाजच्या एक्झिटमुळे निक्कीचा झाला आहे इमोशनल ब्रेकडाऊन

Bigg Boss Marathi Season 5 Day 58 : 'बिग बॉस मराठी' हा सीझन (Bigg Boss Marathi Season 5) प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे.

Bigg Boss Marathi Season 5 Day 58 : ‘बिग बॉस मराठी’ हा सीझन (Bigg Boss Marathi Season 5) प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. (Bigg Boss Marathi) पण या सीझनमधील एका जोडीने मात्र प्रेक्षकांचं चांगलच लक्ष वेधून घेतलं आहे. ही जोडी म्हणजे निक्की (Nikki Tamboli) आणि अरबाज (Arbaz Patel). आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील अरबाजचा प्रवास संपला आहे. (Emotional Breakdown) अरबाजचा प्रवास संपल्याने निक्की मात्र खूव भावूक झालेली पाहायला मिळत आहे.


‘बिग बॉस मराठी’च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये, (Bigg Boss Marathi New Promo) निक्कीला अरबाजची खूप आठवण येत असल्याचं पाहायला मिळत आहे. निक्की म्हणतेय,”अरबाज तू मला सोडून कुठे गेला आहेस?”. पुढे अरबाजच्या नावाचाच कॉफी कप निक्की वापरताना दिसत आहे. निक्की म्हणतेय,”मी घरात तुझ्या नावाचा कप घेतला आहे…पण तुच नाही आहेस आज”. जान्हवी पुढे म्हणतेय,”ही राणी पूर्ण हल्ली आहे”.

अंकिता म्हणतेय, ‘आपल्यावरही ‘ती’ वेळ येणार’

‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात अंकिता, सूरज, पॅडी आणि डीपी दादा चर्चा करताना दिसत आहे. अंकिता म्हणतेय,”काल निक्की आणि अरबाजवर जी वेळ आली ती आपल्यावरही येणार”. डीपी दादा पुढे म्हणतात,”आता दिवस कमी राहिले आहेत”.

Bigg Boss Marathi: अशा बॉडीचा उपयोग काय? नेटकऱ्यांनी संग्रामला सुनावलं

घरातील अरबाज पटेलचा प्रवास संपला

‘बिग बॉस मराठी’च्या या आठवड्यात अरबाज घराबाहेर पडल्याने निक्कीसह सर्व सदस्यांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातल्या या चॉकलेट बॉय अरबाजने ताकदीच्या जोरावर अनेक टास्क जिंकले. या आठवड्याचा तो कॅप्टनदेखील होता.

‘बिग बॉस मराठी’च्या घरातून प्रत्येक आठवड्याला कोणाला ना कोणाला बाहेर पडावं लागतं. अरबाजने त्याच्या पद्धतीने चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न केला. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून निरोप घेताना अरबाज म्हणाला,”महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी मला आपलंसं केलं आहे. माझा प्रवास त्यांनी पाहिला आहे. या खेळात माझं काही चुकलं असं मला वाटलं नाही. निक्कीसोबतची जर्नी खूप छान होती”.

follow us