Bigg Boss Marathi Season 5 Day 62 : ‘बिग बॉस’च्या घरात बहुप्रतिक्षीत (Bigg Boss Marathi Season 5 ) ‘फॅमिली वीक’ टास्क (Family Week) सुरू झालेला आहे. (Bigg Boss Marathi) ‘बिग बॉस’मध्ये ‘फॅमिली वीक’ सुरू झाल्याचं पाहून प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्यामुळे आता कुटुंबीय येऊन घरातील सदस्यांना काय सल्ला देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरत आहे. आजच्या भागात मुंबईत कधीही पाऊल न ठेवलेले अंकिताचे बाबा ( Ankita Walawalkar ) तिला भेटण्यासाठी ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आलेले पाहायला मिळतील.
‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो सर्वांनाच भावूक करणारा आहे. ( Kokan Hearted Girl) या प्रोमोममध्ये अंकिताला ( Ankita Walawalkar ) भेटण्यासाठी सर्वात आधी तिच्या दोन बहिणी आलेल्या दिसत आहेत. बहिणींची भेट होत असतानाच ‘बिग बॉस’ तिला पुन्हा फ्रिज करतात आणि घरात तिच्या वडिलांची एन्ट्री होते. आज बिग बॉस मराठीच्या घरात अंकिता आणि तिच्या बाबांचा अश्रूंचा बांध फुटलेला पाहायला मिळणार आहे. मुंबईत कधीही पाऊल न ठेवलेले अंकिताचे बाबा आज पहिल्यांदाच आपल्या लाडक्या लेकीला भेटण्यासाठी मुंबईत आले आहेत. अंकितासाठी हा सुखद धक्का होता. प्रत्येक लेकीसाठी आपला बाबा हा खूप खास असतो. अंकितासाठीदेखील तिचा बाबा खूप स्पेशल असल्याचं प्रोमोमध्ये स्पष्ट दिसत आहे.
डीपी दादांच्या अश्रूंचा बांध फुटला
आजच्या भागात आई-वडिलांना पाहताच डीपी दादांच्या अश्रूंचा बांध फुटलेला पाहायला मिळेल. ‘बिग बॉस मराठी’च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये,”बिग बॉस” म्हणत आहेत,”एका सदस्यांचं स्वप्न होतं वडिलांनी आपलं कौतुक करावं…आणि आज तो दिवस आला आहे”. डीपी दादांचे वडील म्हणत आहेत,”यापेक्षा सुख काहीच नाही”. घरच्यांना पाहताच डीपी दादा खूप भावूक झालेले पाहायला मिळाले.
Ankita Walawalkar: कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरचा ‘कसे विसरु’ नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!
‘बिग बॉस मराठी’च्या घरातील मंडळी आज एका वेगळ्याच रुपात पाहायला मिळतील. त्यांचे रडवेले चेहरे पाहताना प्रेक्षकदेखील भावनिक झालेले पाहायला मिळतील. आज घरात ड्रामा, टास्क नाट्य नसेल तर सदस्यांचे खरे चेहरे पाहायला मिळतील.