Ankita Walawalkar: कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरचा ‘कसे विसरु’ नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!
Ankita Walawalkar New Song Release: मराठीत नवनवीन धाडसी प्रयोग व्हायला लागलेत, (Ankita Walawalkar) असाच एक धाडसी प्रयोग रिव्हर्स मोशनमध्ये उलगडण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे प्रणिल आर्ट्स निर्मित “कसे विसरू” ( Kase Visru Song) हे गाणं. गेल्या अनेक वर्षाचं मैत्रीचं रूपांतर हे प्रेमात होतं, नातं बहरु लागतं आणि मग नको असलेलं एक नवं वळण काय असू शकतं? (Social Media) हे व्यक्त करणारी आजवर कधीही न पाहिलेली “सरळ चालणाऱ्या नाजूक नात्याची ही उलटी गोष्ट…” म्हणजेच “कसे विसरु” ?
View this post on Instagram
“दादर अभिमान गीता”च्या अभूतपूर्व यशानंतर प्रणिल आर्ट्स या निर्मिती संस्थेचा हा तिसरा व्हिडिओ असून या अनोख्या प्रयोगाला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. गाण्याची पटकथा, मांडणी आणि दिग्दर्शनांची धुरा प्रणिल हातिसकरने यांनी सांभाळली आहे. तसेच प्रख्यात गायक केवल वाळंज ह्यांच्या सुमधुर आवाजामध्ये हे गाणं स्वरबद्ध केले आहे.
या प्रेमळ अशा गाण्यातून चाहत्यांची सर्वांची लाडकी कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता वालावलकर आणि सध्याचा मराठी सिरीयलमधील आघाडीचा अभिनेता विवेक सांगळे अशी नवीन धमाकेदार जोडी आपल्या भेटीला आली असून ही दोघांची जोडी फार सुरेख दिसत असून त्यांचा अभिनय सुद्धा साजेसा झालेला आहे.
‘चंदीगढ करे आशिकी’ चित्रपटाला दोन वर्ष पूर्ण! अभिषेक कपूरने शेअर केली भावनिक पोस्ट
एखादी गोष्ट सरळ मार्गाने दाखवणं हे रिव्हर्स मोशनच्या तुलनेमध्ये बऱ्यापैकी सोप्पं आहे, कारण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट उलटी उलगडत आपण घेऊन जात असतो. त्यावेळेस कलाकारांचे हावभाव सुद्धा बदलत असतात.ही गोष्ट फार बारकाईने करावी लागते आणि तेच बारकावे अत्यंत सुरेख पद्धतीने हाताळून प्रणिल हातिसकर ह्यांनी “कसे विसरू” ह्या गाण्याची रिव्हर्स मोशनमध्ये निर्मिती केली आहे.