Download App

Bigg Boss Marathi : घरात अभिजीत बिचुकलेला राग अनावर; सदस्यांचा करणार पाणउतारा

Bigg Boss Marathi Season 5 Day 63 : 'बिग बॉस मराठी'च्या घरातील ( Bigg Boss Marathi Season 5) सदस्यांना आज चांगलाच धक्का मिळणार आहे.

Bigg Boss Marathi Season 5 Day 63 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांना आज चांगलाच धक्का मिळणार आहे. (Bigg Boss Marathi Season 5) याआधी घरात कल्ला केलेल्या डॉ. अभिजीत बिचुकलेची (Dr Abhijeet Bichukle) आज ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री होणार आहे. (Bigg Boss Marathi) अभिजीतच्या येण्याने आज घरात वाद, भांडणे, राडा, गोंधळ, ड्रामा असं सर्वकाही पाहायला मिळणार आहे.


‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi New Promo) नव्या प्रोमोमध्ये अभिजीत बिचुकलेची घरात एन्ट्री होताना पाहायला मिळत आहे. बिचुकले म्हणतोय,”डॉ. अभिजीत बिचुकलेका सादर नमस्कार”. अभिजीतच्या एन्ट्रीला ‘मैं हूँ डॉन” हे गाणं खास वाजवण्यात आलं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अभिजीत बिचुकले पुन्हा एकदा त्याच्या स्टाईलने धुमाकूळ घालताना दिसून येईल.

‘बिग बॉस मराठी’च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये अभिजीत बिचुकले सदस्यांचा पाणउतारा करताना दिसणार आहे. अंकिताची शाळा घेत बिचुकले म्हणतोय,”बहिण असं कधीच करत नाही, कुचकेपणा तुमचा दिसला. राग येतोय मला…मी काहीही फोडू शकतो या घरातलं”.

Bigg Boss Marathi : सूरज आणि पॅडीची जोडी भेदू शकेल का घरातील महाचक्रव्युह?

घरात ‘ड्रामाक्वीन’च्या स्टाईलने होणार ठणाणा

‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की,”राखी सावंतने हॅलो बिग बॉस म्हणत बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री घेतली आहे. बिग बॉसला राखी म्हणतेय,”मी राखी सावंत तुमची पहिली बायको”. त्यानंतर निक्कीला राखी म्हणतेय,”सस्ती राखी सावंत. आता घरात चालणार माझंच ठणाणा…निक्की तांबोळी सोडून येणार तुला अंबोली”.

राखीला पाहताच निक्कीचा चेहरा बघण्यासारखा झाला आहे. निक्की बोलण्यात कोणाला ऐकत नाही. त्यामुळे आता राखी सावंतला ती कसं गप्प करणार हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. तसेच ‘बिग बॉस मराठी’च्या घरात राखी सावंत आज तिच्या स्टाईलने जबरदस्त कल्ला करताना दिसणार आहे.

follow us