Bigg Boss Marathi Season 5 Day 69: ‘बिग बॉस मराठी’चा खेळ आता अंतिम टप्प्यावर आला आहे. (Bigg Boss Marathi Season 5) लवकरच हा खेळ प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. (Bigg Boss Marathi ) आज मिड वीक एव्हिक्शन पार पडलं असून महाराष्ट्राची लाडक्या वर्षा ताईंनी (Varsha Usgaonkar ) या घराचा निरोप घेतला आहे. वर्षा ताई जिंकाव्या अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा होती. पण कुठेतरी त्यांचा खेळ कमी पडला. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील आज कोणाचा प्रवास संपणार याकडे प्रेक्षकांचं आता लक्ष लागलं आहे. वर्षा उसगांवकर, अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर, अंकिता प्रभू – वालावलकर , धनंजय पोवार आणि सूरज चव्हाण यांच्यापैकी एका सदस्याचा प्रवास संपणार होता.
‘बिग बॉस मराठी’च्या घराचा निरोप घेतल्यानंतर वर्षा ताई म्हणाल्या,”मला असं वाटलं होतं की मी रेडकार्पेटवर जाईल. फायनलिस्टमध्ये असेन. पण शेवटी जनतेची इच्छा नियतीची इच्छा असते.आज मी घराचा निरोप घेत आहे हे माझ्यासाठी खूप धक्कादायक आहे. शेवटपर्यंत राहण्याची माझी इच्छा होती… पण हरकत नाही. सगळी स्वप्न आपल्या मनाप्रमाणे होत नाही. हा खेळ खेळण्याचं मी धाडस दाखवलं”.
वर्षा ताई घराबाहेर पडताना त्यांनी घरातील इतर सदस्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ गाजवणाऱ्या 90 च्या दशकातील महानायिका वर्षा उसगांवकर या ‘बिग बॉस मराठी’च्या घरात जाणाऱ्या पहिल्या सदस्य ठरल्या होत्या. स्वप्नसुंदरी, महिलांची लाडकी स्टाईल आयकॉन आणि ड्रीमगर्ल अशी वर्षा उसगांवकर यांची ओळख. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातही त्यांनी आपल्या प्रभावी मराठी भाषेने, आणि आपल्या हटके स्टाईलने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं.
Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात येणार DJ Kratex; आज होणार मिड वीक एव्हिक्शन
‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज सूरजचा जलवा
सर्वच सदस्य आज त्यांच्या त्यांच्या पद्धतीने कल्ला करताना दिसून येतील. पण घरातील गोलीगत सूरज चव्हाणचा जलवा मात्र तमाम प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेईल.’बिग बॉस मराठी’च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये सूरज आपला जलवा दाखवताना दिसत आहे. “काठी न् घोंगडी घेऊन द्या की”, या गाण्यावर सूरज आपल्या स्टाईलने थिरकताना दिसत आहे. सूरजच्या साधेपणाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आज घरात तो चांगलाच धुमाकूळ घालताना दिसेल.