Download App

Bigg Boss Marathi : पाणगेंडा ओळखताना सूरजची झाली दमछाक; पाहा प्रोमो

Bigg Boss Marathi Season 5 Day 53 : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमध्ये (Bigg Boss Marathi Season 5) नावीन्य आहे.

Bigg Boss Marathi Season 5 Day 53 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमध्ये (Bigg Boss Marathi Season 5) नावीन्य आहे. या आठवड्यात घरात जंगल राज असणार आहे. 50 दिवस उलटल्यानंतरही टास्कमध्ये सदस्य तेवढीच मजा करताना दिसत आहेत. त्यामुळे टास्क (New Task) आणखी रंगतदार होणार आहे. आजच्या भागात पाणगेंडा ओळखताना सूरजची दमछाक झालेली पाहायला मिळेल. त्यामुळे घरात एकच कल्ला होईल.


‘बिग बॉस मराठी’चा आगामी भागाचा प्रोमो (Bigg Boss Marathi New Promo) सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. प्रोमोमध्ये, अंकिता (Ankita Walavalkar) सूरजला (Suraj Chavan) पाणगेंड्याची अॅक्टिंग करुन दाखवत आहे. तर सूरजला ती कोणत्या प्राण्याची अॅक्टिंग करतेय हे ओळखायचं आहे. सूरजने गेंडा बरोबर ओळखला आहे. पण पाणगेंडा ओळखण्यात त्यांची झालेली पंजायत पाहून प्रेक्षकांना मात्र मजा येईल.

सूरजने पाणगेंडा ऐवजी फक्त गेंडा म्हटल्याने अभिजीत म्हणतोय,”पूर्ण केलं नाही अजून”. त्यावर हताश सूरज म्हणतोय,”काहीच कळत नाही आहे. ओळखलाय पण पाण्यातला गेंडा माहिती नाही”. बी बी करन्सी मिळवण्याचा हा टास्क मात्र खूपच मजेदार आहे. संपूर्ण घराने एकत्रित किती बी बी करन्सी कमावली हे जाणून घेण्यासाठी आजचा भाग नक्की पाहायला मिळणार आहे.

Bigg Boss Marathi : ‘दम असेल तर तोंडावर बोल’, निक्कीचं संग्रामला खुलं चॅलेंज

घरातील जंगलात रंगणार नवा टास्क

या आठवड्यात घरात ‘जंगल राज’ सुरू आहे. आज जंगलराजमध्ये शेपटीवाल्या प्राण्यांची सभा भरणार आहे. लहानपणी ‘शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा’ हे गीत ऐकलेच असेल. तशीच सभा आज या जंगलात भरणार आहे. या सभेत कोण होईल सभापती आणि मधोमध उभा राहील हे पाहावे लागेल. बी बी करन्सी मिळवण्याचा हा टास्क प्रेक्षक मात्र एन्जॉय करतील. शेपटीवाल्या प्राण्यांच्या सभेत कोणती जोडी सरस ठरणार? या सभेत कुठल्या जोडीच्या वाट्याला आला शून्य? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना आजचा भाग पाहावा लागेल. एकंदरीतच आज बिग बॅासच्या घरात शेपटीवाल्या प्राण्यांची सभा भरणार आणि सदस्यांना मिळणार बी बी करन्सी.

‘या’ आठवड्यात नॉमिनेट झालेले सदस्य

अरबाज पटेल, जान्हवी किल्लेदार, निकी तांबोळी, सुरज चव्हाण, वर्षा उसगांवकर

follow us