Bigg Boss Marathi: ‘मी एकदम साधा माणूस, पण राग आला तर…’; गोलीगत सूरज चव्हाण स्पष्टच बोलला

Bigg Boss Marathi: ‘मी एकदम साधा माणूस, पण राग आला तर…’; गोलीगत सूरज चव्हाण स्पष्टच बोलला

Bigg Boss Marathi Season 5 Day 48 : ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi) घरातील गोलीगत सूरज चव्हाणने (Suraj Chavan) अल्पावधीतच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आजच्या भागात सूरज पॅडी दादा आणि अंकितासोबत (Ankita) गप्पा मारताना दिसून येणार आहे. दरम्यान सूरज म्हणतोय,”गाव म्हत्त्वाचं आहे मला. कधी गावाकडे जातोय आणि सर्वांना भेटतोय असं मला झालंय. इथे नुसता आरडाओरडा सुरू असतो”. त्यावर अंकिता म्हणते, आपल्या भावनांवर कंट्रोल करणं गरजेचं आहे”. सूरज पुढे म्हणतो,”मी एकदम साधा माणूस आहे. पण राग आला तर मी पुढचं मागचं बघत नाही. इथे मी स्वत:ला खूप कंट्रोल केलंय”. त्यानंतर सूरज पॅडी दादांची मसाज करताना दिसून येतो. सूरजचा मसाज पाहून पॅडी दादा म्हणतात,”तुला मसाज काय असतो तेच दाखवतो”. ‘बिग बॉस’च्या घरात न बोलणारा सूरज चव्हाण आता हळूहळू बोलायला लागलेला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by LetsUpp Marathi (@letsupp.marathi)


कॅप्टनसी टास्कमध्ये निक्की झाली हतबल

दुसरीकडे कॅप्टन न होता आल्याने निक्की हतबल झाली आहे. हतबल झालेल्या निक्कीवर ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्य चर्चा करताना दिसणार आहेत.जान्हवी म्हणतेय,”मला ट्रॉफी मिळो किंवा नको मिळूदेत पण मला निक्कीचा गर्व उतरवायचा आहे”. त्यावर पॅडी दादा म्हणतात,”तिचा गर्व उतरलाय.. हतबल झाली आहे ती आता”. अंकिता म्हणतेय,”आम्ही तिला सांगत होतो फुटेज देऊ नको आम्हाला तू बाहेर जा”.

अरबाजने केलाय जान्हवीचा गेम

‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात जान्हवी आणि अभिजीत अरबाजबद्दल चर्चा करताना दिसणार आहेत. जान्हवी म्हणतेय,”अरबाजला मला काहीतरी मोठं काम द्यायचं होतं. माझी टीम जर तयार असेल तर मी करेल असं मी त्याला म्हणाले होते”. अभिजीत म्हणतो,”मागच्या आठवड्यात तिकडे सुरू होतं ते आता तुझ्यासोबत सुरू आहे”. जान्हवी म्हणते,”करुदेत..माझ्याकडे सगळ्याची उत्तरं आहेत. कॅप्टनसी पदाच्या उमेदवारीतून मला काढण्यात आलंय. मी त्याला का आता सेफ करावं”.

Bigg Boss Marathi: आर्याच्या चुकीचा होणार पंचनामा, बिग बॉस देणार मोठी शिक्षा?

जान्हवीचं निक्कीला चॅलेंज

कॅप्टनसीवरुन निक्की आणि जान्हवीमध्ये जोरदार भडका उडाला आहे. दोघी एकमेकांना चॅलेंज देताना आजच्या भागात दिसतील. समोर आलेल्या प्रोमोमध्ये जान्हवी निक्कीला म्हणतेय,”दम असेल तर मला बाहेर काढून दाखव..चॅलेंज आहे”. त्यावर निक्की म्हणते,”कॅप्टनसीमधून तिला काढलं याचा राग आलाय तिला”. जान्हवी पुढे म्हणते,”या घरात सगळ्यांना तू घाण झाली आहेस”.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube