Download App

माझ्या ‘राजाराणी’ चित्रपटावर अन्याय होतोय; सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्या, सुरजची चाहत्यांना भावनिक साद

Suraj Chavan News : बिग बॉस विजेता सुरज चव्हाण याचा 'राजाराणी' चित्रपट चाहत्यांच्या भेटीला आलाय. या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्या, असं

Suraj Chavan Rajarani Film : बिग बॉस विजेता सुरज चव्हाणचा (Suraj Chavan) “राजाराणी” चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. परंतु यासंदर्भात एक मोठं वृ्त्त समोर आलंय. सुरज चव्हाण म्हणतोय की, माझ्या राजाराणी चित्रपटावर (Rajarani Movie) अन्याय होतोय. सर्वांनी चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्या, असं आवाहन देखील सुरज चव्हाणने केलंय.

आमचा चित्रपट आम्ही उतरवनार नाही , चित्रपट सुरूच राहणार, असं रोहन पाटील यांनी ठणकावून सांगितलं आहे. ज्यांना राजाराणी चित्रपटाला विरोध करायचा आहे. त्यांनी माझ्याबरोबर बसून एकदा चित्रपट बघा, असं आवाहन निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी केलंय. भयंकर कष्टातून आम्ही चित्रपट बनवला आहे, असं शिवाजी दोलताडे यांनी सांगितलं आहे. 18 ऑक्टोबर 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला “राजा राणी” चित्रपट हा आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

अभिनेता सयाजी शिंदे नंतर सुरज चव्हाणही अजितदादांच्या पक्षात? ‘त्या’ भेटीमुळे अनेक चर्चांना उधाण

नुकताच बिग बॉस जिंकून (Bigg Boss Winner) आलेला आणि सर्वांच्या मनावर राज्य करत असलेला सुरज चव्हाणने काम केलेला ‘राजाराणी’ चित्रपट बॅन करा, अशी ॲड. वाजीद खान यांनी मागणी केली आहे. ॲड. वाजीद खान यांच्या म्हणण्यानुसार असं येत की, ‘राजाराणी’ चित्रपट पाहिल्यावर मुले मुली आत्महत्या करतील, पण हा चित्रपट खूप काही चांगले सांगणारा आहे. ह्या चित्रपटातून मुलामुलींनी खूप शिकण्यासारखं आहे, असं चित्रपटाचे लेखक निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी म्हणाले आहेत.

Bigg Boss Marathi: घरात सूरजला मिळणार सुखद धक्का; आत्या अन् बहिणींना पाहताच पाणावले डोळे

आमच्या चित्रपटावर जाणूनबुजून अन्याय होतोय. प्रेक्षकांनी आम्हाला भरभरून प्रेम द्या. सपोर्ट करा, असं यावेळी बिग बॉस विजेता सुरज चव्हाण सुद्धा बोलला. खूप शून्यातून आणि खूप कष्टातून आम्ही हा “राजाराणी” चित्रपट बनवला आहे. आम्ही हा चित्रपट उतरवणार नाही. लोक आमच्यावर भरभरून प्रेम करतील. आमच्यावर होणारा अन्याय मोडून काढतील, असं देखील यावेळी चित्रपटाचा प्रमुख अभिनेता रोहन पाटील म्हणाला आहे. खूप मोठे कलाकार आणि खूप चांगली स्टोरी असलेला आमचा राजाराणी चित्रपट आम्ही बॅन होऊन देणार नाही. लोक चित्रपटावर भरभरून प्रेम करतील, अशी यावेळी दिग्दर्शक शिवाजी दोलताडे म्हणाले.

 

Tags

follow us