Akhil Bhartiya Marathi Natya Parishad: अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेची निवडणुक (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad) नुकतीच पार पडली आहे, तर आता अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. (Natya Parishad Election 2023) 16 मे 2023 रोजी नाट्यपरिषदेच्या कार्यकारी समितीची आणि अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. आता या निवडणुकीमध्ये भाजपने देखील चांगलीच उडी घेतली आहे.
नाट्य परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप (BJP) विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) (Shiv Sena) असा सामना रंगणार असल्याची चर्चा आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीकरिता प्रसाद प्रसाद कांबळींना भाजप नेते आशिष शेलारांचा (Ashish Shelar) तर प्रशांत दामलेंना उद्योगमंत्री उदय सामंत यांचा (Uday Samant) पाठिंबा मिळणार आहे. नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूकीमध्ये अवघ्या काही दिवसांवर आलोय आहे.
निवडणूक जवळ आल्यामुळे आता या निवडणूकीमध्ये चांगलंच सुरीचे राजकारण रंगू लागल्याचे दिसून येत आहे. प्रशांत दामलेंनी अध्यक्षपद सोडून इतर पदांवर उभे असलेले उमेदवार हे इतर पक्षाशी नाळ असणारी मंडळी आहेत. प्रशांत दामलेंच्या ‘रंगकर्मी नाटक समूह पॅनल’ला उद्योगमंत्री उदय सामंत यांचा पाठिंबा मिळाला आहे. नाट्यपरिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान प्रशांत दामले यांच्या पॅनलसाठी उदय सामंत यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांची देखील भेट घेतली असल्याची चर्चा आहे.
मोठी बातमी! शाहरुखच्या मुलाला तुरुंगात टाकणाऱ्या समीर वानखेडेंवर सीबीआयची छापेमारी; गुन्हा दाखल
तसेच प्रसाद कांबळींच्या ‘आपलं पॅनल’ला आता भाजप नेते आशिष शेलार यांचा पाठिंबा मिळाला असल्याचे समजत आहे. प्रसाद कांबळी यांच्या पॅनलमध्ये रंगभूमीवर कार्यरत असलेले नाट्यकर्मी, बॅकस्टेज आर्टिस्ट आणि रंगभूमीशी जवळीक असणारी मंडळी आहेत. मराठी रंगभूमी हा आपला एक सांस्कृतिक ठेवा आहे. तसेच भाजप हा पक्ष नेहमी प्रत्येक गोष्टीत चांगल्या माणसांच्या पाठी नेहमीच भक्कम राहावा लागतो.
यामुळे आपण प्रसाद कांबळी आणि त्याच्या पॅनलला साथ देत आहोत, अशी भावना आशिष शेलार यांनी यावेळी व्यक्त केली आहे. नाट्यपरिषदेवर सध्या राज्यभरातून निवडून आलेले ६० सदस्य अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करणार आहेत. या निवडणुकीमध्ये प्रसाद कांबळींच्या नेतृत्वाखाली ‘आपलं पॅनल’ मैदानात आहेत, तर दुसरीकडे प्रशांत दामलेंच्या नेतृत्वाखाली ‘रंगकर्मी नाटक समूह पॅनल’ मैदानात आहे.