Download App

Kadak Singh Movie: पंकज त्रिपाठींचा ‘कडक सिंह’ सिनेमाचा पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

Kadak Singh Movie Poster Release: बॉलिवूडमधील (Bollywood) सुप्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) हे त्यांच्या अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकत असतात. पंकज त्रिपाठी यांच्या आगामी सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट बघत आहेत. लवकरच पंकज त्रिपाठी यांचा ‘कडक सिंह’ (Kadak Singh) हा सिनेमा चाहत्यांना भेटीला येणार आहे. या सिनेमाचे पोस्टर नुकतेच रिलीज ( Poster Release) करण्यात आला आहे. या पोस्टरनं चाहत्यांचं लक्ष वेधले आहे.


पंकज त्रिपाठी यांनी कडक सिंह चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. (Pankaj Tripathi Upcoming Films) या पोस्टरला त्यांनी कॅप्शन लिहिले आहे की, ‘कहानियां कईं पर सच सिर्फ एक. क्या कड़क सिंह झूठ के आगे की चीजों को देख पाएगा?’ कडक सिंह सिनेमाच्या पोस्टरमध्ये पंकज त्रिपाठी यांचे गंभीर हावभाव बघायला मिळत आहेत. कडक सिंह सिनेमाचं पोस्टर पाहिल्यानंतर आता पंकज त्रिपाठी यांच्या या सिनेमात कोणती कथा दाखवण्यात येणार आहे? याकडे आता चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

पंकज त्रिपाठी यांचा कडक सिंह हा सिनेमा झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे. IMDb नुसार, पंकज त्रिपाठी हे ‘कडक सिंह’ या सिनेमामध्ये ए के श्रीवास्तव नाम ही मुख्य भूमिका साकारणार आहेत. पंकज त्रिपाठी यांच्याबरोबर संजना सांघी, पार्वती थिरुवोथु यांनी ‘कडक सिंग’ या सिनेमामध्ये काम केलं आहे. अनिरुद्ध रॉय चौधरी यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

IFFI 54 : गोव्यातील ‘इफ्फी महोत्सवा’त फॅरी चित्रपटांची प्रीमियरसाठी निवड

कडक सिंह या सिनेमासोबतच पंकज त्रिपाठी यांच्या इतर आगामी सिनेमाची देखील चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट बघत आहेत. “मैं अटल हूं, मेट्रो इन दिनो आणि स्त्री-2 हे पंकज त्रिपाठी यांचे सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात पंकज त्रिपाठी यांना ‘मिमी’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. ‘मिमी’ या सिनेमामधील पंकज त्रिपाठी यांच्या अभिनयाला चाहत्यांची मोठी पसंती मिळाली आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज