IFFI 54 : गोव्यातील ‘इफ्फी महोत्सवा’त फॅरी चित्रपटांची प्रीमियरसाठी निवड

IFFI 54 : गोव्यातील ‘इफ्फी महोत्सवा’त फॅरी चित्रपटांची प्रीमियरसाठी निवड

IFFI 54: गोवा येथे (54th IFFI in Goa) इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (International Film Festival) ऑफ इंडिया या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गेली काही वर्षे सतत 5 ते 6 चित्रपटांची निवड होऊन ते दाखवले जातात. यंदा 54 व्या इफ्फीमध्ये इंडियन पॅनोरमा विभागात (Indian Panorama Section) निवड झालेल्या अधिकृत यादीत एकाही मराठी चित्रपटाला स्थान मिळालेले नाही. कथाबाह्य चित्रपट विभागातील तीन लघुपट सोडले तर चित्रपट विभागात एकाही मराठी चित्रपटाची निवड झालेली नाही. तसेच फॅरी (Farrey Movie) चित्रपटांची प्रीमियरसाठी निवड करण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटांनी चित्रपटगृहांतही बऱ्यापैकी आर्थिक यश मिळवले आहे. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातूनही चित्रपट सातत्याने पुरस्कार मिळवत आहेत. असे असूनही देशातील प्रतिष्ठित महोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इफ्फी या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एकाही मराठी चित्रपटाला मान्यता न मिळण्याची नामुष्की ओढवली आहे.

याबाबत माहिती देत असताना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, ‘भारत हा जगातील सर्वात मोठा चित्रपट निर्मिती करणारा देश आहे. या देशातील चित्रपट आणि मीडिया इंडस्ट्री जगात खूप मोठी आहे. पायरसीविरुद्धच्या लढाईत भारत संपूर्ण जगाच्या चित्रपट उद्योगासोबत उभा आहे. G20 च्या यशस्वी आयोजनानंतर पुन्हा एकदा जगातील देश या महोत्सवासाठी गोव्यात येत आहेत’.

सलमान खानने भाची अलिझेहच्या आगामी ‘फरे’ चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. या चित्रपटात अलिझेह अग्निहोत्री मुख्य भूमिकेत आहे आणि हा एक मनोरंजक थ्रिलर चित्रपट असणार आहे, जो परीक्षेच्या फसवणुकीच्या रॅकेटमध्ये अडकलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनावर केंद्रित आहे. चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये अलिझेह आणि शालेय गणवेशात अभिनेत्यांचा एक गट, ‘A+’ चिन्हांनी वेढलेले आणि त्यांच्याकडून पैसे येत असल्याचे दिसत आहेत.

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आगामी ‘Journey’ सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात

गेल्या काही काही दिवसांपूर्वी सलमान खानने त्याची भाची अलिझेहसोबतचे सुंदर फोटोही शेअर केले होते. पोस्टमध्ये असेही लिहिले आहे की, “मामूवर एक उपकार करा, तुम्ही जे काही कराल ते मनापासून आणि मेहनतीने करा! नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यात सरळ जा. फक्त स्वतःशीच स्पर्धा करा. फिट होण्याच्या तुमच्या शोधात एकसारखे होऊ नका आणि वेगळे होण्याच्या तुमच्या शोधात वेगळे होऊ नका. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, एकदा तुम्ही वचनबद्धता केली की, मामाचेही ऐकू नका!”, अशी पोस्ट भाईजानने केली होती. या पोस्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube