Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आगामी ‘Journey’ सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आगामी ‘Journey’ सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात

Nana Patekar Movie Journey Shooting : आजवर मराठीत कायम हटके आणि नवनवीन विषयांना हात घालणारे सिनेमा होत आहेत. (Nana Patekar) यासाठी मराठी सिनेमासृष्टी प्रसिद्ध आहे. सनी देओल (Sunny Deol) आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) यांच्या ‘गदर 2’ (Gadar 2) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घालता होता. ‘जर्नी’ सिनेमाचे दिग्दर्शक अनिल शर्मा (Anil Sharma) यांनी त्यांच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या सिनेमात मराठमोळे अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहेत. नानांनी या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केल्याची माहिती दिली आहे.


नाना पाटेकरांचा ‘जर्नी’ हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात नानांसह, उत्कर्ष शर्मा देखील (Utkarsh Sharma) प्रमुख भूमिकेत बघायला मिळणार आहे. आता या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत शूटिंगला सुरुवात झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.

‘जर्नी’ हा सिनेमा मुलगा आणि वडिलांच्या नात्यावर आधारित असणार आहे. या सिनेमामध्ये वडिल- मुलाचं अनोखं नातं दाखवण्यात आलं आहे. 2024 मध्ये हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नानांच्या या सिनेमाची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे. ‘जर्नी’ या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यानचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये नानांसोहत उत्कर्ष शर्मा देखील बघायला मिळत आहे.

Apurva Song: ‘अपूर्वा’ सिनेमातील पहिलं गाणं रिलीज; तारा सुतारियाचा चित्रपट ‘या’ दिवशी येणार भेटीला

नाना पाटेकर यांचा ‘ओले ओले’ हा मराठी सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 5 जानेवारी 2024 दिवशी हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नुकतचं या सिनेमाचं एक पोस्टर सोशल मीडियावर आऊट झालं आहे. या सिनेमात नानांसह सिद्धार्थ चांदेकर आणि सायली संजीव हे कलाकार देखील बघायला मिळणार आहेत. कोकोनट मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘ओले आले’ मराठी सिनेमाच्या मोशन पोस्टरसोबत कॅप्शनमध्ये लिहिलेली ‘एक अशा प्रवासाची रंजक गोष्ट, ज्याने शिकवले जीवन जगण्याचे सूत्र!’ ही ओळ आणखी कुतूहल निर्माण करणारी आहे. हे त्रिकुट कुठे चालले आहे? या प्रवासाचं नेमकं प्रयोजन काय असणार आहे? असे काही प्रश्न उत्सुकता निर्माण करणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube