Download App

एका दिग्दर्शकाने मला ब्लाउज काढण्यासाठी.. बॉलिवूड धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा ‘तो’ प्रसंग काय?

दिग्दर्शक पुढे म्हणाले, मी माधुरीला स्पष्टपणे सांगितलं होतं की, ही खूप महत्त्वाची परिस्थिती आहे आणि मी हा सीन पहिल्याच

Bollywood actress Madhuri Dixit : बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित धकधक गर्ल म्हणून ओळखली जाते. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण एका चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान दिग्दर्शकाच्या मागणीमुळे (Madhuri) माधुरीला धक्का बसला होता. ती सेटवरून थेट निघून गेली होती.

टीनू आनंद हे बॉलीवुडमधील अशी व्यक्तिमत्त्व आहे, ज्यांनी पडद्यावर आणि पडद्यामागे दोन्ही ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अभिनेता म्हणून त्यांनी पडद्यावर आपली छाप पाडली, तर दिग्दर्शक म्हणून त्यांनी अप्रतिम काम केलं. मात्र, त्यांनी माधुरी दीक्षितकडून ब्लाउज काढण्याची विशेष मागणी केली होती? या मागणीमुळे सेटवर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. हा वाद इतका वाढला की, संतापलेल्या दिग्दर्शकाने माधुरीला चित्रपटातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. या चित्रपटात माधुरीसोबत अमिताभ बच्चन यांचाही समावेश होता.

जी सर्वात सुरक्षित जागा तिथंच माझा विनयभंग झाला होता; या अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

रेडियो नशाशी झालेल्या संभाषणात टीनू आनंद यांनी या घटनेचा खुलासा केला होता. ते म्हणाले, “मी माधुरीला संपूर्ण सीनबद्दल सांगितलं होतं. मी तिला सांगितलं होतं की, तुला ब्लाउज काढावं लागेल आणि पहिल्यांदा आम्ही तुला ब्रामध्ये पाहू. मी काहीही लपवू इच्छित नाही, कारण तू एका व्यक्तीसमोर स्वतःला समर्पित करत आहेस, जो तुझी मदत करत आहे.

दिग्दर्शक पुढे म्हणाले, मी माधुरीला स्पष्टपणे सांगितलं होतं की, ही खूप महत्त्वाची परिस्थिती आहे आणि मी हा सीन पहिल्याच दिवशी शूट करू इच्छितो. माधुरीने याला सहमतीही दर्शवली होती. टीनू यांनी सांगितलं, मी माधुरीला सांगितलं होतं की, तू तुझी ब्रा डिझाइन करू शकतेस, तुला हवी तशी. पण ती ब्रा असायला हवी. हा चित्रपटाचा पहिला सीन होता. पण सीन तयार होताच माधुरीने तो सीन करण्यास नकार दिला. तिला कॅमेऱ्यासमोर ब्रामध्ये दिसण्यात अस्वस्थता वाटत होती. माधुरी तब्बल 45 मिनिटं ड्रेसिंग रूममधून बाहेर आली नाही.

follow us