Priyanka Chopra : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिच्या (Priyanka Chopra) ‘अनफिनिश्ड’ या पुस्तकाचे हिंदीतील अनुवादित पुस्तक जागतिक पुस्तक प्रदर्शनात दाखल झाले आहे. ग्लोबल आयकॉन प्रियंकाच्या या पुस्तकाची अनेक दिवसांपासून चर्चा होती. प्रियांका चोप्रा-जोन्सच्या “अभी बाकी है सफर” या पुस्तकाचं नुकतच हिंदी अनुवादित पुस्तक जागतिक पुस्तक मेळ्यात (WorldBookFair2024) दिसणार आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या साहित्य रसिकांत उत्सुकता आहे.
‘अनफिनिश्ड’ इंग्रजी भाषेतील पुस्तक फेब्रुवारी 2021 मध्ये इंग्रजीमध्ये प्रकाशित झाले होते आणि आता या पुस्तकाने खूप प्रेम प्रशंसा मिळवली आहे. प्रख्यात बॉलीवूड अभिनेत्री आणि जागतिक आयकॉन प्रियंका चोप्रा-जोन्सच्या बालपणापासून ते मनोरंजन उद्योगात प्रसिद्धी मिळवण्यापर्यंतच्या प्रवासाची एक झलक आहे.
Met Gala 2023 : मेट गालामध्ये प्रियंकाने घातला 204 कोटींचा नेकलेस, आता होणार लिलाव
हिंदीमध्ये या पुस्तकाचं अनुवाद करण्याचा निर्णय झाला आहे. या माध्यमातून प्रियंका चोप्राचा प्रवास नेमका कसा राहिला याची माहिती मिळणार आहे. जागतिक पुस्तक प्रदर्शनात या पुस्तकाला मागणी वाढली आहे. ग्लोबल आयकॉन म्हणून असलेली प्रियंकाची ओळख ही अभिनयाच्या पलिकडचा तिचा प्रवास दाखवून देते. तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक संघर्ष तिच्या प्रवासाची गोष्ट यातून उलगडत जाते.
#WorldBookFair2024 हा एक प्रसिद्ध वार्षिक कार्यक्रम आहे जो जगभरातील प्रकाशक, लेखक आणि पुस्तकप्रेमींना आकर्षित करतो. या प्रतिष्ठित मेळ्यात ‘अनफिनिश्ड’चे हिंदी रूपांतर लाँच करण्यात येणार असल्याने प्रियंका चोप्रासाठी ही उल्लेखनीय गोष्ट ठरणार आहे. प्रियंका चोप्राच्या या इंग्रजी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन 2021 मध्ये झाले होते. त्यावेळी हे पुस्तक लोकप्रिय ठरले होते. या पुस्तकात प्रियंकाने चित्रपटसृष्टीतील काही अनुभव सांगितले आहेत. चित्रपटसृष्टीत स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. फिल्मी परिवारातून जे येतात त्यांना येथे संघर्ष करावा लागत नाही. त्यांनाच आधी प्राधान्य दिले जाते, यांसारखे काही धक्कादायक अनुभव प्रियंकाने या पुस्तकात सांगितले आहेत.
‘ही’ आहे प्रियंकाच्या 65 वर्ष जुन्या बनारसीपासून बनवलेल्या ड्रेसची खासियत