Met Gala 2023 : मेट गालामध्ये प्रियंकाने घातला 204 कोटींचा नेकलेस, आता होणार लिलाव

Met Gala 2023 : मेट गालामध्ये प्रियंकाने घातला 204 कोटींचा नेकलेस, आता होणार लिलाव

Priyanka Wore 204 cores neckless in Met Gala : फॅशन इव्हेंट मेट गाला 2023 मध्ये देश-विदेशातील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. यावेळी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटने मेट गालामध्ये पहिल्यांदाच हजेरी लावली. यावळी तिने पाढऱ्या मोत्यांचा ड्रेस घातला होता. तर प्रियांका चोप्राच्या लूकने मेट गालामध्ये लक्ष वेधलं. ती पती निक जोनससह इव्हेंटला पोहचली होती. तर तिने ब्लॅक गाउन परिधान केला होता. तर तिने अत्यंत सुंदर असा नेकलेस परिधान केला होता. या नेकलेसची प्रचंड चर्चा आणि प्रेक्षकांना चकित करणारी गोष्ट समोर आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

या नेकलेसची चकित करणारी गोष्ट ही आहे की, या नेकलेसी किंमत तब्बल 204 कोटी आहे. त्यामध्ये 11.06 कॅरेटचे डायमंड लावलेले आहेत. ते बुलगारीने डिझाइन केलं आहे. सोशल मीडियावर याबद्दल माहिती आली आहे की, त्याची किंमत 25 मिलियन अमेरिकी डॉलर आहे. आता या नेकलेसचा लिलाव करण्यात येणार आहे. असं देखील सांगण्यात येत आहे.

Salman Khan: ‘…कोण आहे ती महिला? नेटकऱ्यांनी भाईजानला विचारला प्रश्न

बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंतचा प्रवास करणारी प्रियंका चोप्रा आज ग्लोबल स्टार झाली आहे. इंस्टाग्रामवर तिचं फॅन फॉलोइंग 86.9 मिलियन असून ती पती निक जोनससह लॉस एंजेलिसमध्ये राहते. हे कपल अत्यंत लग्झरी लाईफ जगतं. त्यांच्याकडे असलेल्या महागड्या आणि दुर्मिळ गोष्टींबद्दल सांगायचं झालं तर तिच्याकडे 5.25 कोटींची Rolls-Royce Ghost ही गाडी आहे. 21.75 कोटींचे कानातले, 144 कोटींची हवेली. यांसारख्या अनेक महागड्या गोष्टी आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube