‘ही’ आहे प्रियंकाच्या 65 वर्ष जुन्या बनारसीपासून बनवलेल्या ड्रेसची खासियत
मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांचा ड्रीम प्रोजेक्ट प्रत्यक्षात आला आहे. मुंबईतील NMACC (नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर) चे उद्घाटन 31 मार्च शुक्रवारी झाले. NMACC चा प्रक्षेपण कार्यक्रम तीन दिवस चालले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यावरांनी हजेरी लावली. त्यांच्या फॅशनची यावेळी प्रचंड चर्चा देखील झाली.
अशीच चर्चा झाली ती बॉलिवूड आणि आता हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्राची (Priyanka Chopra) प्रियंकाने नीता अंबानी यांच्या मुंबईतील NMACC (नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर) चे उद्घाटनामध्ये सर्वांचे लक्ष वेधले. तिने यावेळी 65 वर्ष जुन्या बनारसी साडीपासून बनवलेला ड्रेस परिधान केला होता. याबद्दल स्वतः प्रियंकाने आपल्या इंन्स्टग्राम अकाउंटवरून माहिती दिली आहे.
या पोस्टमध्ये प्रियंका म्हणाली आहे की, ‘हा सुंदर ड्रेस 65 वर्ष जुन्या बनारसी विंटेज बनारसी पटोला (ब्रोकेड) साडीपासून बनवलेला आहे. यामध्ये चांदीचे धागे आणि खादी सिल्कवर सोन्याचे इलेक्ट्रोप्लेटींगचा वापर करण्यात आला आहे. सिक्वीन्स शीट होलोग्राफिक बस्टियरने नऊ रंग तयार करण्यात आले आहे. तर हा ड्रेस तयार करण्यासाठी तब्बल 6 महिन्यांचा कालावधी लागल्याचं देखील यावेळी प्रियंकाने सांगितलं. तसेच तिने अमित आणि त्याच्या टीमचे आभार मानले आहेत.
तुम्हाला माहिती आहे का? गौतमीला कोणता खेळाडू आवडतो? पहा ती काय म्हणाली…
दरम्यान देसी गर्ल प्रियंका सध्या लेक आणि नवऱ्यासह (Priyanka Chopra) भारतामध्ये दाखल झाली आहे. (Baby Malti Marie) प्रियंकाची मुलगी Malti Marie हीची इंडियामध्ये येण्याची ही पहिलीच वेळ आहे. (Harrdy Sandhu) विमानतळावर तिघांनाही एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. (Malti Marie Chopra) दरम्यान परिणिती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाच्या अफवांदरम्यान प्रियंकांचं भारतामध्ये सहकुटुंब दाखल होणं (Malti Marie in Mumbai) हा निव्वळ योगायोग आहे की खरंच परिणीती गुढघ्याला बाशिंग बांधणार याची चर्चा आता यामुळे रंगायला लागली आहे.