Download App

‘योद्धा’ चित्रपट आणि धर्मा प्रॉडक्शनसोबत काम करण्याचं राशि खन्नाचं स्वप्न साकार, अस का म्हणाली?

Raashii Khanna Film Yodha: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra), अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) आणि राशि खन्ना (Raashii Khanna) सध्या त्यांच्या आगामी ‘योद्धा’ सिनेमामुळे (Yodha Movie) जोरदार चर्चेत आले आहे. युवा पॅन-इंडिया स्टार राशी खन्ना (Rashi Khanna) तिच्या आगामी ॲक्शन चित्रपट “योद्धा”च्या (Yoddha Movie) रिलीजसाठी सज्ज झाली असून करण जोहरच्या (Karan Johar) धर्मा प्रॉडक्शन सोबत तिचं हे पहिलं काम आहे. चित्रपटाच्या निमित्ताने तिने एका मुलाखीदरम्यान सांगितलं आहे की, धर्मा प्रॉडक्शन सोबत काम करणं हे कायम स्वप्न होत आणि या चित्रपटाच्या निमित्ताने ते साकार झालं.

‘योद्धा’ सिनेमामधून नव्या विषयावर चित्रपट करण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. धर्माच्या चित्रपटाचा एक भाग होण्याचे आणि शिफॉनची साडी नेसण्याचे आणि आजूबाजूला बर्फ असलेल्या ठिकाणी राहण्याचे माझे नेहमीच स्वप्न होते. योद्धा मध्ये अस काही करता आलं नसलं तरी धर्मा सोबत काम करण्याच्या स्वप्नपूर्ती झाली. योद्धा निर्माता करण जोहरनेही राशी खन्ना आणि चित्रपटातील तिच्या अभिनयाची प्रशंसा केली होती. हा आमचा राशीसोबतचा पहिला चित्रपट आहे, तिच्यासोबत काम करताना आम्हाला खूप मज्जा आली.

करण जोहर निर्मित ‘योद्धा’ मध्ये राशी खन्ना आणि दिशा पटानी पहिल्यांदा सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्क्रीन शेअर करताना पाहायला मिळणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रिलीज होणाऱ्या या सिनेमाची तारीख जवान आणि सालारमुळं पुढे ढकलण्यात आली होती, त्यानंतर अखेर आता येत्या 13 मार्चला हा सिनेमा रिलीज होणार आहे. आता या चित्रपटाच्या अपडेट जाणून घेण्याची सगळ्यांनाच मोठी उत्सुकता होती. त्यानंतर आज सिद्धार्थ मल्होत्राने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत आला आहे.

Yodha: राशी- सिद्धार्थची अनोखी केमिस्ट्री, ‘योद्धा’तील ‘जिंदगी तेरे नाम’ गाणे रिलीज

सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा दिग्दर्शित ‘योद्धा’ हा चित्रपट सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांनी दिग्दर्शित केला आहे तर राशी खन्ना आणि दिशा पटानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. राशी एका सरकारी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. सिद्धार्थने याआधी राशिचे वर्णन चित्रपटातील ‘लेडी योद्धा असे केले होते, जो 15 मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. ‘योधा’ व्यतिरिक्त, राशि खन्ना ‘द साबरमती रिपोर्ट’ आणि ‘टीएमई’ मध्ये विक्रांत मॅसीसोबत दिसणार आहे. तिच्याकडे ‘तेलुसू कडा’ आणि ‘अरनमानाई 4’ देखील आहेत.

follow us