‘शैतान’ चा चौथ्या दिवशी वेग मंदावला; सोमवारी मात्र सिनेमाने केली इतक्या कोटींची कमाई

‘शैतान’ चा चौथ्या दिवशी वेग मंदावला; सोमवारी मात्र सिनेमाने केली इतक्या कोटींची कमाई

Shaitaan Box Office Collection Day 4: अजय देवगण (Ajay Devgn) आणि आर माधवन (R Madhavan) यांच्या हॉरर थ्रिलर चित्रपटाचा वेग चौथ्या दिवशी मंदावला. पहिल्या दिवसापासून तीन दिवस या चित्रपटाची कमाई वाढली, मात्र चौथ्या दिवसापर्यंत त्याच्या बॉक्स ऑफिस (Box Office ) कलेक्शनमध्ये मोठी घट झाली. 9 मार्च रोजी रिलीज झालेल्या ‘शैतान’ने (Shaitaan Movie) तीन दिवसांत 54 कोटींचा टप्पा ओलांडला होता, मात्र सोमवारी केवळ 7 कोटींचा व्यवसाय केला. त्यानंतर एकूण कलेक्शन 62.94कोटी झाले आहे.

चित्रपटाने पहिल्या दिवशी 14.75 कोटींची चांगली कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 27 टक्क्यांच्या वाढीसह 18.75 कोटी रुपयांची कमाई केली. ‘शैतान’ने तिसऱ्या दिवशी सर्वाधिक कमाई केली, या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन 9.33 टक्क्यांच्या वाढीसह 20.5 कोटी रुपये झाले. मात्र सोमवारच्या चाचणीत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला आहे.

अजय देवगणच्या ‘शैतान’ने ‘दृश्यम 2’च्या पहिल्या दिवशीच्या बॉक्स ऑफिसच्या आकड्याशी बरोबरी केली आहे. पण दुसऱ्या दिवशी तो थोडा मागे पडला, ‘दृश्यम 2’ ने दुसऱ्या दिवशी 21.59 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर टिकून राहण्यासाठी 15 मार्चपर्यंतचा वेळ आहे, कारण त्याच दिवशी सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) ​​आणि दिशा पटानी यांचा चित्रपट ‘योधा’ प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर आमने- सामने येणार आहेत.

Bhool Bhulaiyaa 3: ‘भूल भुलैया 3’बद्दल कार्तिकने दिली मोठी अपडेट, पोस्ट करत म्हणाला…

‘शैतान’ चे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. हा चित्रपट 2023मध्ये प्रदर्शित झालेल्या गुजराती हॉरर चित्रपट ‘वश’ ची हिंदी आवृत्ती आहे. ज्याचे लेखन आणि दिग्दर्शन कृष्णदेव याज्ञिक यांनी केले होते. हा चित्रपट काळ्या जादूवर आधारित आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube