Download App

Tamannaah Bhatia : बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया साजरा करणार ‘वर्किंग’ वाढदिवस

Tamannaah Bhatia : यावर्षी कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री ठरली ती म्हणजे तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia). तिचे यंदाच्या वर्षात अनेक चित्रपट रिलीज झाले आणि यातून तिने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. रेड कार्पेटवरचा अनोखा अंदाज असो किंवा अनेक फॅशन आयकॉन म्हणून असलेली तिची ओळख, तमन्ना भाटिया कायम चर्चेत असलेली अभिनेत्री ठरली आहे.

शेड्यूलमध्ये व्यस्त असलेली तमन्ना यंदाचा तिचा वाढदिवस सेटवर साजरा करणार आहेत. कामात राहून ती वाढदिवस खास करणार आहे. तमन्नाने तिचा वाढदिवस तिला सर्वात जास्त आवडत असलेल्या गोष्टींमध्ये साजरा करण्याबद्दल म्हणते “आणखी एक वर्ष, आणखी एक वाढदिवस! यंदाचा वाढदिवस हा कामात राहून साजरा करणार आहे. सेटवरची कामं, इथली लोक आणि निर्मिती असलेल्या या गोष्टीत वाढदिवस साजरा करण्याची मज्जा वेगळी आहे. वर्किंग वाढदिवस साजरा करून येणाऱ्या वर्षात अजून उत्तम काम करायचं आहे.” असं ती म्हणते.

खिलाडीच्या ‘वेलकम’ला 16 वर्ष पूर्ण, अक्षय कुमारने लिहिली खास पोस्ट…

तमन्ना चित्रपटसृष्टीत चमकत असून याव्यतिरिक्त ती जॉन अब्राहम सोबत निखिल अडवाणीचा हिंदी चित्रपट “वेदा” मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 2024 मध्ये रिलीज होणार आहे. सोबतीला बहुप्रतिक्षित तमिळ चित्रपट “अरनामनाई 4” मध्ये दिसणार आहे.

Tags

follow us