खिलाडीच्या ‘वेलकम’ला 16 वर्ष पूर्ण, अक्षय कुमारने लिहिली खास पोस्ट…

  • Written By: Published:
खिलाडीच्या ‘वेलकम’ला 16 वर्ष पूर्ण, अक्षय कुमारने लिहिली खास पोस्ट…

Akshay Kumar celebrates 16 years of Welcome : बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या चांगलाच चर्चेत आहे. लवकरच तो ‘वेलकम 3’ (Welcome 3)या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. दरम्यान, अक्षय कुमार, नाना पाटेकर आणि अनिल कपूर यांनी भूमिका साकारलेल्या वेलकम या कॉमेडी चित्रपटाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं. आता प्रेक्षक पुढच्या भागाची म्हणजे, वेलकम 3 च्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, आता अक्षयने वेलकमच्या (‘Welcome) रिलीजला १६ वर्ष पुर्ण झाल्याचा आनंद साजरा केला.

‘फिर आयी हसीन दिलरुबा’ चित्रपटाची शूटिंग पूर्ण; सोशल मीडियावर अधिकृत माहिती 

वेलकम हा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. तर वेलकम-2 म्हणजेच वेलकम बॅक हा चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. वेलकम या चित्रपटात अक्षय कुमारने महत्त्वाची भूमिका साकारली होती, तर वेलकम बॅकमध्ये अभिनेता जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसला होता. वेलकम आणि वेलकम बॅक हे दोन्ही कॉमेडी चित्रपट होते. या चित्रपटांनी प्रेक्षकांना खूप हसवले. वेलकम मधील मजून भाई आणि उदय भाई ही पात्रे तर आयकॉनिक ठरली होती.

मल्लिकार्जून खर्गे PM फेस? ममतांच्या खेळीने नितीश कुमार, राहुल गांधींचा ‘गेम’ 

दरम्यान, ‘वेलकम टू द जंगल’ या वेलकम फ्रँचायझीचा बहुप्रतीक्षित तिसरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या चित्रपटातील एका रोमांचक झलक अक्षय कुमारने शेअर केली. अक्षयने एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यात सहकलाकार संजय दत्त देखील दिसतोय. यात अक्षय कुमार घोड्यावरून येतांना दिसतोय, तर बाईकवर संजय दत्त य़ेतांना दिसतात.

https://www.instagram.com/reel/C1Gmf9bLvM2/?igsh=MzRlODBiNWFlZA%3D%3D

अक्षय कुमार पुढे म्हणतो, मी फ्रँचायझीच्या तिसऱ्या भाग #WelcomeToTheJungle साठी शूटिंग करत असताना आज आम्ही वेलकमची 16 वर्षे साजरी करतो हा किती छान योगायोग आहे. आणि वेलकम 3 मध्ये संजू बाबा सोबत काम करतांना खूप मजा येत आहे.

वेलकम 3 मध्ये अक्षय कुमार, संजय दत्त, सुनील शेट्टी, दिशा पटानी, रवीना टंडन, लारा दत्ता, जॅकलीन फर्नांडिस, परेश रावल, अर्शद वारसी, जॉनी लीव्हर, राजपाल यादव, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, कृष्णा अभिषेक, किकू शारदा, दलेर सिंग मेहंदी, मुकेश तिवारी, झाकीर हुसेन, यशपाल शर्मा, आणि सयाजी शिंदे यांच्या भूमिका असणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षय कुमारला’वेलकम 3 साठी 95 कोटी रुपये मिळाल्याची चर्चा आहे.

बेस इंडस्ट्रीज ग्रुप प्रस्तुत ‘वेलकम टू द जंगल’ हा फिरोज ए. नाडियादवाला निर्मित आणि अहमद खान दिग्दर्शित चित्रपट 20 डिसेंबर 2024 रोजी ख्रिसमसच्या आठवड्यात भव्य थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube